आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Success Party: \'नटसम्राट\'ची जंगी पार्टी, पोहोचले सुखविंदर,प्रिया,सई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट चित्रपटाचे यश ह्या विकेन्डला मुंबईत चित्रपटाच्या कलाकारांनी साजरे केले. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, अजित परब, जीतेंद्र जोशी, पुजा सावंत, संदिप पाठक ह्या चित्रपटाच्या कलावंतासह प्रसाद ओक, सुखविंदर सिंग, प्रिया बापट, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, समीर विद्वंस, आदिनाथ कोठारे, मनवा नाईक, अमोल गुप्ते, पुष्कर श्रोत्री, रवि जाधव, सुरेश वाडकर असे बरेच सेलिब्रिटी ह्या कलावंतांना शुभेच्छा द्यायला पार्टीत उपस्थित होते.
पार्टीत नटसम्राटच्या झालेल्या भव्य सेलिब्रेशननंतर झी स्टुडियोजचे बिझनेस हेड निखील साने म्हणाले, “ही मराठीतली पहिली फिल्म आहे, जी एकाच वेळी ११०० स्क्रिन्समध्ये रिलीज झालीय. हैदराबाद, दिल्ली, कोलकता, अशा ठिकाणी हाऊसफुल होऊन ख-या अर्थाने वर्षाच्या सुरूवातीला मराठी सिनेमाने अटकेपार झेंडा फडकावलाय. पहिल्या तीन दिवसांत १० कोटी, तर आत्तापर्यंत सुमारे २२ कोटींचा बिझनेस सिनेमाने केलाय. त्यामुळे वर्षाची सुरूवात खूप चांगली झालीय.”
महेश मांजरेकर म्हणतात, “मला कधी न भेटलेल्या डॉक्टर, वकिलांचे फोन मला येतायत. कौतुक करताना एका साऊथ इंडियन व्यक्तिने तर मला तुम्ही हिंदी फिल्म करू नका, तुम्हांला हिंदी करप्ट करेल. तुम्ही चांगले मराठी सिनेमेच करत रहा, अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया मराठी सिनेमासाठी आणि माझ्यासाठीही खूप महत्वाची आहे.”
मांजरेकरांचीच री ओढत नानाही म्हणाले, “ अगदी खरंय, मलाही अगदी अशाच प्रतिक्रिया येतायत. मलाही श्याम मनोहरने प्रतिक्रिया देताना, सर, तुम्ही हिंदीपेक्षा असे मराठीच आशयघन सिनेमा करत रहा, लोकं नक्कीच ते पाहतील अशी प्रतिक्रिया दिली. १० दिवसांमध्ये ६ वेळा चित्रपट पाहिलेले लोकं आहेत. रिक्षावाल्यांपासून ते मोठमोठ्या लेखकांपर्यंत अनेकांनी ही फिल्म पाहिलीय. लोकांचा चांगला रिस्पॉन्स येईल असं वाटलं होतं. पण असा सिनेमाला भरभरून रिस्पॉन्स येईल. असं कधी वाटलं नव्हतं.”
मेधा मांजरेकर म्हणतात, “माझ्या आई वडिलांनी मला जेव्हा चांगली प्रतिक्रिया दिली तेव्हा भरून आलं होतं. विजया मेहता, किशोरी अमोणकर ह्यांनी मला प्रेमाने आणि कौतुकाने दिलेली प्रतिक्रियाही माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”
मृण्मयी देशपांडे फिल्मच्या यशाविषयी सांगते, “माझं फेसबुक आणि ट्विटर सध्या नटसम्राटच्या कौतुकाने भरून गेलंय. अभिनय कारकिर्दीची सुरूवात विक्रम गोखलेंसारख्या दिग्गजांकडे पाहून केली होती. आणि आज एवढ्या दिग्ज कलाकाराने, विक्रम काकांनी मला फोन करावा आणि माझ्या अभिनयाचे कौतुक करावे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नटसम्राटच्या जंगी पार्टीत आलेले सेलिब्रिटी
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...