आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Poshter Girl Trailer Gets More Than One Lakh Views On Social Networking Sites

‘पोश्टर गर्ल’ सोनालीचं होणार स्वयंवर, trailerला मिळाले एक लाखापेक्षा जास्त Views

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पोश्टर गर्ल’ सिनेमाचा नवा ट्रेलर सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर गाजतोय. ‘पोश्टर गर्ल’चा नवा ट्रेलर २१ जानेवारीला फेसबुकवरून प्रसिध्द झाल्यावर आत्तापर्यंत सिनेमाच्या ट्रेलरला फेसबुकवर जवळ जवळ एक लाख १० हजार व्हयुज मिळालेत. तर युट्युबवर २५ हजारहून जास्त व्हयुज मिळालेत. थोडक्यात प्रेक्षकांना ह्या सिनेमाविषयी उत्सुकता आहे. आणि ही उत्सुकता फिल्ममेकर्सनी ताणून धरण्याचा पूरेपूर प्रयत्न प्रोमोमधून केलेला दिसतोय.
सिनेमात सोनालीला पाच इच्छुक‘वर’ आहेत. आणि ह्या पाच अवलियांपैकी नक्की कोणाच्या गळ्यात सोनाली वरमाळा घालणारं हे खूप इंटरेस्टिंग असेल. सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील ह्या प्रोमोविषयी सांगतात, “ही शहरात राहणारी रूपाली गावात येते. तिच्या लग्नाचा घाट तिचे काका घालतात. आणि सिनेमाच्या नायिकेने स्वयंवर करण्याचा अजब निर्णय घेतलाय. मग लग्नासाठी उत्सुक असलेल्या ह्या वरांपैकी आता ती कोणाशी लग्न करतेय, ते तुम्ही सिनेमात पाहालंच. तुमचं मनोरंजन करता-करता एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटातून आम्ही केलाय. ग्रामीण बोली असलेले हे हिरो आहेत पण इतर चित्रपटांसारखं ते फक्त दिग्दर्शकाने सांगितलंय म्हणून बोलत नाहीयेत. तर ते प्रत्येकजण आपल्या व्यक्तिरेखेनुसार ग्रामीण बोलताना आणि क़ॉमेडी करताना तुम्हांला दिसतील.”
अभिनेता जीतेंद्र जोशी म्हणतो,”आपल्याकडे सामाजिक प्रबोधन करणारे सिनेमाचे विषय असले की ते बॉक्स ऑफिसवर कमाई करत नाहीत. पण हा असा चित्रपट आहे, जो सामाजित संदेश देण्यासोबतच तुम्हांला खळखळून हसवत तुमचं मनोरंजन करतो. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल असं मला वाटतं.”
चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यावर एकुणच सोनाली कुलकर्णी ‘हिरो’ असल्याचंच दिसून येतंय. ह्यावर सोनालीला विचारल्यावर ती म्हणते, “हो, ही रूपाली हिरो बनून तुमचं खूप मनोरंजन करेल. पण नायिका प्रधान सिनेमा असल्यामुळे मी हा सिनेमा स्विकारला असं जर कोणाला वाटतं असेल तर ते खरं नाही. हा सिनेमाचा विषयच खूप वेगळा आहे. आणि त्यामुळेच त्याचे प्रोमो जेवढे गंमतीशीर आहेत. तेवढाच सिनेमाही इंटरेस्टिंग आहे. ज्या पध्दतीने ह्या सिनेमात माझी व्यक्तिरेखा आहे. तशी अद्याप कधीच कोणत्याच सिनेमात आलेली नाही. एक वेगळा सिनेमा लोकांसमोर माझ्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्यात मी मुख्य भुमिकेत आहे. त्यात सध्या प्रोमोला एवढी पसंती मिळतीय. त्यामूळे अर्थातच मी खूप खूश आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोश्टर गर्ल सिनेमाचा नवा प्रोमो