आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location : पाहा, पोश्टर गर्लची व-हाडी नाचतायत, Dj Song वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या फिल्मसिटीतल्या मस्त गारव्यात ‘पोश्टर गर्ल’ चित्रपटाच्या व-हाडी मंडळींची वरात निघाली होती. आणि गाणं लागलं होतं, ‘आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय’. ह्या गाण्याचा ऑडियो युट्युबवरून अगोदरच लाँच झालाय. पण गाण्याचं चित्रीकरण नुकतंच मुंबईत झालं.
जीतेंद्र जोशी, संदिप पाठक, सिध्दार्थ मेनन, अनिकेत विश्वासराव, हे ह्या फिल्मचे हिरो, व-हाडी मंडळींसोबत धतिंग नाच करत होते. आणि घोड्यावर चक्क नवरदेवाऐवजी नवरी मुलगी बनून अभिनेत्री नेहा जोशी बसली होती. एरवी लग्नात लाजरी बुजरी दिसणारी नवरी मुलगी थोड्याचवेळात घोड्यावरून उतरली, आणि तिनेही व-हाडी मंडळींसोबत ठेका धरला.
ही आगळीवेगळी वरात का? असं विचारल्यावर फिल्मचे दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले, “जसं गाण्यातले बोल आहेत, त्याप्रमाणे एका गावातल्या वरातीत सगळे नाचतायत. एरवी नवरदेव घोड्यावर दिसतात, पण आमच्या गाण्यात मुलगी हिरो आहे, त्यामुळे ती घोड्यावर बसलीय. पडद्यावर ह्या मंडळींना नाचताना पाहून समोर बसलेले प्रेक्षक नाचतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
समीर पाटील ह्यांच्या ‘पोश्टर बॉइज’मध्ये असलेली नेहा जोशी आता पोश्टर गर्लच्या ह्या गाण्यात आहे. म्हटल्यावर तर उत्सुकता होतीच. ती म्हणते, “पोश्टर बॉइज फिल्ममधली बरीचशी मंडळी ह्याही चित्रपटात आहेत. त्यामुळे जेव्हा मला फक्त ह्या गाण्यापूरतं बोलावलं गेलं, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो म्हटलं. दोन दिवस आम्ही ह्या गाण्याचं चित्रीकरण केलं. आणि चित्रीकरण करताना जाम धमाल आली. गाण्यापूरतं दिसणारी ही नववधू प्रियंका खूप अग्रसिव्ह आहे. ती नव-यामुलासारखी घोड्यावर चढणारी दाखवलीय. आयुष्यात पहिल्यांदा घोड्यावर बसले. आणि मस्त नाचले.”
जीतेंद्र जोशी चांगला अभिनेता असला तरीही, तो डान्सर नाही. त्यामुळे ह्या प्रमोशनल गाण्यासाठी नाचणं, त्याच्यासाठी खूप वेगळाच अनुभव होता, “डान्स करताना खूप अवघडल्यासारखं होतं. गणपतीत ढोल वाजतात तेव्हा ठेका धरणं वेगळं आणि जेव्हा लोकं थिएटरमध्ये पैसे देऊन आपली फिल्म पाहायला येतात. तेव्हा त्यांच्यासमोर नाचणं खूप आवघडं असतं. पण आमच्यासाठी खूप सोप्या स्टेप्स होत्या. गाणं असं आहे, की ते वाजल्यावर त्यावर धतिंग नाचणंच अपेक्षित होतं त्यामुळे वेळ निभावून नेली.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, फिल्मची हिरोइन सोनाली कुलकर्णी ह्या गाण्यात का नाही? सांगतेय, स्वत: सोनाली