आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look And Music Launch Of Marathi Film Shortcut

\'शॉर्टकट\'च्या फर्स्ट लूक आणि म्युझिक लाँचला सेलेब्सची मांदियाळी, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ‘एम के मोशन पिक्चर्स’चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या आगामी 'शॉर्टकट' सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लाँन्च सोहळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी या सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी आवर्जून उपस्थित होती. अभिनेता राजपाल यादवसुद्धा या सोहळ्यात उपस्थित होता.
सिनेमाची वनलाइन...
"सायबर क्राइम" सारखा अत्यंत ज्वलंत विषय 'शॉर्टकट' दिसतो पण नसतो, या सिनेमातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांचे असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही एक वेगळा प्रयोग केला असून प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल असे मत दिग्दर्शक हरिश राऊत यांनी व्यक्त केले.
काय म्हणतोय स्वप्नील...
या सिनेमाला "शॉर्टकट" यश न मिळता घवघवीत असे उत्तम यश मिळू दे, अशी आशा व्यक्त करून अभिनेते स्वप्नील जोशी यांनी या सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
हॅकरच्या भूमिकेत वैभव...
या सिनेमात रोहित प्रधान ही व्यक्तिरेखा मी साकारली असून हा एक उत्तम हॅकर असतो. माझा अगदी जवळचा आणि शालेय मित्र विनय नारायणे यांने सिनेमाची कथा उत्तम लिहिली असून सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रितदेखील झाल्याचे अभिनेता वैभव तत्ववादी याने सांगितले.
सुमधूर संगीताची मेजवानी...
या सिनेमाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी एक दोन नव्हे तर तब्बल सहा कमालीचे संगीतकार लाभले आहेत. या सिनेमात रॉक संगीतासोबतच रोमॅंटिक संगीताची मेजवानी आपल्याला मिळणार आहे सध्या या सिनेमातील 'मखमली….' हे गाणे कमालीचे प्रसिद्ध झाले असून संगीतकार निलेश मोहरीर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. निलेश मोहरीरसह सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनीत दीक्षित, चाँद साध्वानी आणि निक अशा संगीतकारांचे संगीत या सिनेमाला लाभले असून सिनेमातील गाणी गायक स्वप्नील बांदोडकर, कौशिक देशपांडे, मोहोमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, गायिका सावनी रविंद्र, आनंदी जोशी आणि राही यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
सिनेमाची स्टारकास्ट...
आजवर अनेक नावाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी प्रमोटर म्हणून काम पाहणाऱ्या GSEAMS कंपनीचे अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशाणदार हे या सिनेमासाठीदेखील प्रमोटर म्हणून काम पाहत आहे. 'शॉर्टकट' सिनेमात अभिनेते राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे या त्रिकुटाचा उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. येत्या ७ ऑगस्टला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शॉर्टकट'च्या फस्ट लूक आणि म्युझिक लाँचला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक..