आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरूण, अर्जुन,टायगर पाठोपाठ आता कोणत्या मराठी स्टारचा मुलगा येतोय फिल्म इंडस्ट्रीत... जाणून घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टारकिड्स वरूण धवन, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ
प्रत्येक वडिल आपल्या मुलाला आपल्यापेक्षा सवाई बनवण्याचा प्रयत्न करतात. आपला मुलगा आपल्यापेक्षा दोन पावलं पूढे जावा असं स्वप्न प्रत्येक पित्याचं असते. आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी आपल्याला मुलाच्या करीयरला आपल्या अनुभवाचं भक्कम पाठबळ दिलेय. मग तो स्टंटमास्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगण असो, की शहनशाह अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन. अगदी वरूण धवन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या आई-वडिलांनी त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवेश हा धूमधडाक्यात आणि योग्य चित्रपटाद्वारे व्हावा यासाठी प्रयत्न केलेच.
आता हाच बॉलीवूड स्टार्सचा कित्ता आपल्या मराठीतही गिरवला जातो आहे. गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने आपलं एक वेगळं स्थान मिळवलेले अभिनेते आणि फिल्ममेकर नागेश भोसले आता आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करत आहेत. नागेश भोसले यांचा मुलगा अमरेंद्रला लाँच करण्यासाठीच जणू ‘पन्हाळा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले असावे, असं पन्हाळ्याचा फस्ट लूक टिझर पाहिल्यावर वाटते.
‘पन्हाळा’ हा ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेला गडकिल्ला. त्याची वैशिष्ठ्य तिथे जाणा-या अनेक पर्यकांना नेहमीच भूरळ घालत आलीयत. पण अभिनेता आणि फिल्ममेकर नागेश भोसले यांनाही या ‘पन्हाळा’ गडाच्या सृष्टीसौदर्याने, गूढतेने झपाटून टाकले. आणि त्यांनी ‘पन्हाळा’ हा चित्रपटच निर्माण केला आहे.
पन्हाळा हा जेवढा गुढ आहे, तेवढीच गुढता ब-याचदा मानवी नातेसंबंधांमध्ये असते. जसजसे आपण गढकिल्यात गेल्यावर त्याचं सौंदर्य आपल्यासमोर खुलू लागते. तशीच नातीही असतात. आणि पन्हाळ्याच्या साक्षीने तिथे पर्यटनासाठी येणा-या दोन जोडप्यांमधले नातेसंबंध या चित्रपटातून फिल्ममेकर नागेश भोसले उलगडून दाखवणार आहेत.
नागेश भोसले निर्मित आणि दिग्दर्शित पन्हाळा या चित्रपटात नागेश भोसले स्वत: मुख्य भूमिकेत असणारच आहेत. पण त्याचसोबत मकरंद देशपांडे, अमृता संत, समिधा गुरू आणि संग्राम साळवी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पूढील स्लाइमध्ये जाणून घ्या, नागेश भोसले यांच्या मुलाबद्दल.