आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK : 'फुंतरू'मध्ये केतकी माटेगावकरचा नवा लूक, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फुंतरु' या सिनेमातील केतकीचा नवीन लूक)

'शाळा' या सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा करणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन सुजय डहाकेंनी केले होते. 'शाळा'नंतर आता पुन्हा एकदा सुजय आणि केतकी एकत्र आले आहेत.
'शाळा' आणि 'आजोबा' या दोन सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले असून त्यांचा 'फुंतरू' हा आगामी मराठी सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सुजय यांच्या या सिनेमात केतकी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून अलीकडेच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यात नेहमीपेक्षा केतकीचा वेगळा लूक पाहायला मिळतोय. निळेक्षार डोळे, डोक्यावर फुलांचा मुकूट अशा रुपात केतकी कमालीची सुंदर दिसत आहे.
'फुंतरू' ही एक सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी आहे. केतकीसह या सिनेमात बालक-पालक'मधल्या भाग्याची अर्थातच अभिनेता मदन देवधर झळकणार आहे. मराठीतला पहिला साय फाय प्रेमपट असेलल्या या सिनेमाची निर्मिती अजय ठाकुर आणि वंदना ठाकुर यांची आहे. या सिनेमाच्या कथेविषयी सुजय यांनी गुप्तता पाळली असून, कथा सांगण्यापेक्षा पडद्यावर पाहणे जास्त रंगतदार असेल, असे सुजय यांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'फुंतरु'ची स्टोरी नॅरेट करतानाची सुजय आणि केतकीची खास छायाचित्रे...
(फोटो साभारः 'फुंतरु' या सिनेमाचे ऑफिशिअल फेसबुक अकाउंट)