"'स्वराज्य' हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी गर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे भारतीय असंतोषाचे जनक आणि समाजसुधारक लोकमान्य टिळक. लोकमान्य यांच्या आयुष्यावर आधारित 'लोकमान्य- एक युगपुरूष' हा सिनेमा 2 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा फस्ट लूक त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यावर येत्या 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुण्यात मान्यवरांच्या उपस्थित या सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात येणार आहे.
या सिनेमात
आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून जनतेची बाजू मांडणारे आणि ब्रिटीश सरकारला रोखठोक प्रश्न विचारणारे संपादक आणि समाजसुधारक टिळक रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
आजच्या राजकिय, समाजिक परिस्थितीकडे पाहून आज समाजाला अशा महान पुरुषांच्या विचारांची गरज आहे असे वाटते. नेमक्या याच मनोवृत्तीवर बोट ठेवणारा 'लोकमान्य- एक युगपुरूष' हा सिनेमा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे काही सीन्स...