आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजीत खांडकेकरला वाटते, कशाचे ‘भय’? जाणून घ्या.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी चित्रपट 'भय'चे फस्ट लूक पोस्टर
नेहमी आपल्या चित्रपटांमध्ये ‘भीती’ ही काय ती फिल्मच्या हिरोइनलाच वाटतं असते. आणि फिल्मचा हिरो एकदम डॅशिंग आणि डायनॅमिक असतो. त्याच्या रूबाबाने आणि मारधाडीमूळे फिल्मच्या खलनायकाला तो एकदम सळो की पळो करून टाकतो. रूढार्थाने खरं तर, हिरो हा असाच असतो. पण सचिन काटरनावरे निर्मित आणि राहूल भातणकर दिग्दर्शित नवीन चित्रपट ‘भय’ मध्ये फिल्मचा हिरोच भित्रा आहे.
चित्रपटातल्या हिरोलाच असं भित्र का बनवलं? असा प्रश्न दिग्दर्शक राहूल भातणकरला विचारताच तो म्हणतो,”भित्रेपणा हा एक रोग आहे. पण ब-याचदा लोकं भित्रेपणावर हसतात तरी, नाही तर त्याला ‘वेड’ अशी संज्ञा वापरतात. या रोगाला इंग्रजीत स्किझोफ्रेनिया असे म्हणतात. स्किझोफ्रिनक पेशंटला सतत भीती असते, की कोणीतर मला मारणार किंवा काहीना कसले आवाज ऐकु येतात, काहीना तर माणसही दिसतात. पण आपण त्याला एक तर भुताने पछाडलं असं म्हणतो. किंवा मग वेड लागलं असं ठरवून टाकतो. पण हा आजार आहे, आणि तो बरा होऊ शकतो. हेच या चित्रपटातून मी दाखवलंय. आणि म्हणूनच चित्रपटाचा मुख्य अभिनेताच या आजाराने ग्रस्त आहे.पण ह्याशिवाय बरंच काही चित्रपटात आहे. ही एक मिस्ट्री आहे. त्यामुळे आता जास्त सांगता येणार नाही.”
चित्रपटात अभिजीत खांडकेकर शिवाय अभिनेत्री स्मिता गोंदकर सुध्दा आहे. स्मिता आपल्याला अभिजीतच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राहूलच्याच ‘टाइम बरा वाईट’ या चित्रपटात अभिनय केलेले सतिश राजवाडे, आपल्याला एन्काउन्टर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत.या दोघांशिवाय खलनायकाच्या भूमिकेत विनीत शर्मा असेल. तर संस्कृती बालगुडे आणि सिध्दार्थ मेनन यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
‘भय’ चित्रपट ३१ जुलैला रिलीज होतो आहे.
पुढील स्लाइड्समध्ये पहा, चित्रपटाच्या फस्ट लूक लाँचवेळी झालेल्या पार्टीचे फोटो