आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पूणे-मुंबई-२ चा फस्ट लूक लाँच, मुक्ता-स्वप्निल करतायत लग्नाचे आमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी
पाच वर्षांपूर्वी मुंबई-पूणे-मुंबई हा चित्रपट आल्यानंतर याच्या सिक्वलची वाट स्वप्निल-मुक्ताचे चाहते पाहत होते. आता शेवटी, येत्या १२ नोव्हेंबरला ह्या चित्रपटाचा सिक्वल सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. आणि नुकत्याच लाँच झालेल्या त्याच्या फस्ट लूक टिझर वरून मुक्ता आणि स्वप्निलचं ह्या सिनेमात लग्न होणार असंच दिसतंय.
मात्र लग्नाचं आमंत्रण आपल्या प्रेक्षाकांना करताना दोघंही भांडताना दिसतायत. यावर दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात,” भांडण हा प्रेमाचा स्थायीभाव आहे. जिथे प्रेम असतं तिथेच भांडण असतं. त्या व्यक्तिने आपल्या आयुष्यातून निघून जाऊ नये, म्हणून आपण भांडतो. आपल्या माणसाच्या एखाद्या निर्णयाने फरक पडतो म्हणूनच आपण भांडतो ना. आणि भांडणं तर प्रेमाला अधिक गहिरं करत जातं. पहिल्या चित्रपटात तुम्हांला मुक्ता-स्वप्निल प्रेमात पडताना दिसले. त्यात ते दोघेच होते. आता तुम्हांला ह्या दोघांचे घरचेही दिसतील. आणि एकुणच त्यामुळे धमाल येईल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वप्निल जोशीने कशाला म्हणतोय बासुंदी?