आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look Poster Of First Marathi Sci Fi Film Phuntroo

Sc-Fi Film फुंतरूचे first पोस्टर, वाचा फिल्मविषयी सांगतेय, glamours केतकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजय डहाके दिग्दर्शित मराठीतल्या पहिल्या Sci-Fi फिल्मचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच अनविल करण्यात आले आहे. मदन देवधर आणि केतकी माटेगांवकर ह्या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. त्यांचा लूक ह्यामध्ये दिसतोय.
चित्रपटातल्या आपल्या भुमिकेबद्दल अभिनेत्री केतकी माटेगांवकर सांगते, “मी साधी राहणी पसंत करणा-या पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. त्यामुळे मी कधी स्वत:ला ग्लॅमरस रूपात इमॅजिनही केलं नव्हतं. गेल्या काही चित्रपटांमधून मला भुमिकाही साध्या सोज्वळ मुलीच्याच मिळाल्या. मी ही त्यामुळे स्वत:ला काहीतरी वेगळ्या रूपात पाहू इच्छित असताना, सुजयदादाने मला ही ग्लॅमरस भुमिका दिली.”
केतकी आपल्या ग्लॅमरस लूकविषयी सांगताना पूढे म्हणते, “पिवळ्या रंगाच्या पोस्टरमध्ये पांढरा ड्रेस घालून आणि पांढरी-पिवळी फुलं डोक्यात घालून बनवलेला माझा लूक, ह्या चित्रपटातला सर्वात पहिला लूक आहे. लूक टेस्ट करताना काहीतरी करून पाहू, असं म्हणून बनवलेला तो लूक सगळ्यांना आवडला. स्वत:ला आरशात पाहिल्यावर तर मी मलाच पाहून चमकले. मी मलाच ओळखू शकले नव्हते. एवढी ग्लॅमरस आणि वेगळी वाटत होते. त्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आला.”
सध्या अनविल झालेल्या फस्ट लूक पोस्टरमधून केतकीचे दोन लूक्स रिव्हील जाले असले तरीही केतकीचे ह्यात दहा ते बारा वेगवगेळे लुक्स आहेत. ती सांगते, “विनोद सरोदेने माझा लूक डिझाइन केलाय, तर डिझाइनर चंदन गांधींनी माझे १०-१२ महागडे डिझाइनर कपडे बनवलेत. ह्या भुमिकेसाठी मी सात किलो वजन वाढवलं. ह्यात माझे दहा-पंधरा ग्लॅमरस लुक्स आहेत. ही सायन्स-फिक्शन फिल्म आहे. ह्यात माझी एका इंजिनअरची भुमिका आहे. मी कलाशाखेची विद्यार्थीनी असल्याकारणाने मला इंजिनिअरींगविषयी काहीही माहिती नव्हती. म्हणूनच चित्रपट सुरू होण्याअगोदर आमची काही ग्रुमिंग सेशन्स झाली. दोन-अडीच महिने आम्ही शिकलो. आणि मग शुटिंगला सुरूवात केली.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'फुंतरू' चित्रपटाचा फस्ट लूक