आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘& जरा हटके’ मध्ये दिसणार मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनील सेनगुप्ताची हटके Lovestory

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरॉस इंटरनॅशनलच्या रवी जाधव निर्मित ‘& जरा हटके’ सिनेमाचा प्रोमो युट्युबवर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. ‘कॉफी आणि बरंच काही’ दिग्दर्शित करणा-या प्रकाश कुंटेची फिल्म असल्यामूळे सध्या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाल्यावर उत्सुकता निर्माण झालीय.
फिल्मच्या प्रोमोमध्ये शिवानी रंगोले आणि सिध्दार्थ मेनन ह्यांच्यातले संवाद आणि मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनील सेनगुप्तामधली लव्हस्टोरी पाहून ही आता प्रौढ प्रेमकथा असल्याचं दिसून येतंय.
ह्याविषयी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटेशी संवाद साधल्यावर तो म्हणतो, “कॉफी आणि बरंच काही’ ही एक संवादच्या अभावामूळे अडथळे आलेली प्रेमकथा होती. ती यंगस्टर्सची लव्हस्टोरी होती. ‘अँड जरा हटके’ मात्र मॅच्युअर्ड लव्हस्टोरी आहे. चाळीशी ओलांडलेल्या दोन व्यक्तिंची ही हळूवार प्रेमकथा आहे. ह्यात काही सरप्राइज एलिमेन्ट्स आहेत. भावा-बहिणीची आणि त्यांच्या पालकांची ही कथा आहे. मृणालचा ह्यात घटस्फोट झालाय. तर इंद्रनीलची सहचारिण नाहीये. मी खूप जास्त नाट्यमय कथा बनवत नाहीय त्यामुळे ही साधी पण गुंतागुतीच्या नात्याची कथा आहे.”
अभिनेता सिध्दार्थ मेनन चित्रपटाविषयी सांगतो, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे. कारण ह्या चित्रपटाशी निगडीत इरॉस इंटरनॅशनलशी माझं जूनं नातं आहे. माझी २०११ मधली पहिली फिल्म ‘पेडलर्स’ त्यांचीच फिल्म होती. ‘पेडलर्स’ फिल्म कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली होती. तसंच रवी जाधव आणि मला ब-याच काळापासून एकत्र काम करायचं होतं. आणि प्रकाशची ‘कॉफी आणि बरंच काही’ मला खूप आवडली होती. त्यात जेव्हा ‘अँड जरा हटके’ची कथा वाचली. तेव्हा तर कथानकाच्या प्रेमातच पडलो. अगदी प्रकाशच्या पाठी लागलो होतो. की आता ही फिल्म आपण कधी सुरू करूया.”
पुढील स्लाइडमध्ये एन्ड जरा हटके सिनेमाचा फस्ट लूक ट्रेलर