आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Marathi Actress Devika Bhise Who Working In British And Hollywood Films

देविका भिसे- पहिली मराठी हॉलीवूड हिरोइन.. जाणून घ्या तिच्या आगामी फिल्मविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनहॅटनमध्ये जन्मलेली आणि तिथेच स्थायिक असलेली अभिनेत्री देविका भिसेची ब्रिटीश फिल्म ‘दि मॅन हू नोज इन्फिनिटी’ २६ एप्रिलला रिलीज होतेय. भारतीय वंशांच्या आणि मराठी आडनावाच्या देविकासाठी हा निश्चितच एक मोठा ब्रेक आहे. अंकगणितीशास्त्रज्ञ एस रामानुजन ह्यांच्या चरित्रावर बनलेल्या ह्या सिनेमात देव पटेल रामानुजन ह्यांच्या भुमिकेत आहे. तर रामानुजन ह्यांच्या पत्नीच्या जानकीच्या भुमिकेत देविका आहे.
देविका खरं तर २००८ पासून हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसतेय. उमा थर्मन स्टारर एक्सिडेंटल हसबंडम हा तिचा पहिला ह़ॉलीवूडपट. ती न्युयॉर्क शहारातल्या नाटकांमध्ये सक्रिय असते. तसंच तिने दोन टिव्ही मालिकाही केल्यात. मॅथ्यू ब्राउनच्या ‘दि मॅन हू नोज इन्फिनिटी’ सिनेमामध्ये भुमिका मिळवण्यासाठी तिला जवळ जवळ दोन महिने धडपडावं लागलं. वेगवेगळ्या स्क्रिनटेस्ट ऑडिशन्स झाल्यवर मग तिला ही भुमिका मिळाली.
देविका आपल्या भुमिकेविषयी सांगते, “मी चौथ्या वर्षाची असल्यापासून भरतनाट्यम शिकतेय. त्यामुळे भारतीय संस्कृतीशी नाळ घट्ट जोडली गेली. तसंच तमिळ अय्यंगार ताल-बोली-ठेका ह्याचे संस्कारही भरतनाट्यममुळे झाले. त्यामुळे मी पटकन ह्या सिनेमातल्या माझ्या भुमिकेशी एकरुप होऊ शकले. माझ्या भरतनाट्यममुळेच असावं कदाचित ही भुमिका मला मिळायला मदत झाली.”
सिनेमा जरी इंग्रजीत असला, तरीही देविकाला थोडं तमिळ बोलावं लागलं. देविकाला न्यूयॉर्कमध्ये राहून ह़ॉलीवूडमध्ये आपलं करीयर करायची इच्छा आहे. आणि तिचं हे स्वप्न सत्यात उतरतानाही सध्या दिसतंय कारण तिच्या ‘दि मॅन हू नोज इन्फिनिटी’ सिनेमाला सध्या वेगवेगळ्या फिल्मफेस्टिव्हल्समध्ये नावाजलं जातंय. आणि त्यामुळे तिला नवे प्रोजेक्ट्स मिळायलाही मदत होतेय.