आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फ्रिक आहे मराठमोळी भाग्यश्री, पन्नाशीच्या वयातही तरुणींना लाजवते तिचे सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सांगलीची राजकुमारी आणि एकाच बॉलिवूड चित्रपटाने प्रसिद्ध असेलली अभिनेत्री भाग्यश्री आजही तितकीच फिट दिसते. त्याचे कारण जर आपण पाहायचे असेल तर आपल्याला तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर जावे लागेल. पन्नाशीच्या वयात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसते. फिटनेस फ्रिक असलेली भाग्यश्री हेल्दी रुटीन फॉलो करण्याला प्राधान्य देते. तिच्या इन्सटा अकाउंटवर तिने अनेक फोटोज् आणि हेल्दी ब्रेकफास्टचे फोटो शेअर केले आहेत. आज त्यातील काही खास फोटो खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
वयाच्या 21 वर्षी केले होते लग्न... 

भाग्यश्री वयाच्या 21 व्या वर्षी विवाहबंधनात अडकली होती. चित्रपट निर्माता हिमालयच्या प्रेमात पडलेल्या भाग्यश्रीने घरच्यांविरुद्द जाऊन लग्न केले होते. भाग्यश्री आता दोन मुलांची आई आहे. भाग्यश्रीचा मोठा मुलगा अभिमन्यू लवकरच बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे.
 
मालिकेतून केला होता डेब्यू...
भाग्यश्रीने अमोल पालेकर यांच्या कच्ची धुप या मालिकेतून अॅक्टींग डेब्यू केला होता. तिचा प्रभावशाली अभिनय पाहून अमोल पालेकर यांनी तिला चित्रपटात येण्यास सुचवले. यानंतर 'मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली. मैने प्यारलकिया रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 18 वर्षाची होती.
 
लग्नानंतर करिअर ठरले फ्लॉप...
'कैद मै है बुलबुल', 'त्यागी' आणि 'पायल' या तीन चित्रपटात भाग्यश्रीने लग्नानंतर काम केले पण हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. यानंतर भाग्श्रीने चित्रपटांना अलविदा करत कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, भाग्यश्रीचे इन्सटाग्राम अकाउंटवरील काही खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...