तेजश्री, स्पृहा, प्रिया, तेजस्विनी, मुक्ता, आल्या एकत्र
तेजश्री प्रधान, स्पृहा जोशी, प्रिया बापट आणि तेजस्विनी पंडित ह्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या चार लिडींग एक्टरेस मुक्ता बर्वेच्या ‘डबल सीट’ चित्रपटाच्या प्रिमीयरला आल्या. आणि ह्या पाच अभिनेत्रींना एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहण्याचा दुर्मिळ योग त्यांच्या चाहत्यांसाठी जुळून आला.
ह्युज फिल्म्स आणि प्रतिसाद फिल्म्स निर्मित एस्सेल व्हिजन प्रस्तुत, 'डबलसीट' चित्रपटाच्या प्रिमीयरला ह्या पाच अभिनेत्रींशिवाय अंकुश चौधरी, वंदना गुप्ते, संजय जाधव, उमेश कामत, सुबोध भावे, साक्षी तन्वर हे सेलेब्ससूध्दा उपस्थितीत होते.
'डबल सीट' चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वंसने केले आहे. तर विद्याधर जोशी, अंकुश चौधरी, वंदना गुप्ते आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या ह्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
मायानगरी असलेल्या मुंबई शहरातील एका सर्वसामान्य जोडप्याची ही गोष्ट आहे. ‘डबल सीट’ चित्रपटाची कथा जरी मुंबईतल्या जोडप्याची असली तरी ही गोष्ट सर्वच शहरातील मध्यमवर्गीय घरातील जोडप्याची आणि त्यांच्या स्वप्नांची आहे. आयु्ष्य जगतांना कायम विशिष्ट चौकटीतला आणि आवाक्यातलाच विचार करायचा ही मध्यमवर्गीय कुटुंबाची मानसिकता असते. ती चौकट मोडून त्या बाहेर उडी घ्यायचं स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण होण्यासाठी घ्याव्या लागणा-या कष्टाची ही गोष्ट आहे.
कुरीअर कंपनीत काम करणारा अमित आणि खाजगी विमा कंपनीत काम करणारी मंजिरी हे लालबागमधील जुन्या चाळीतील घरात राहणारं मध्यमवर्गीय जोडपं. या दोघांची स्वप्न खूप छोटी छोटी आहेत आणि आपल्या या आयुष्यात ते आनंदीही आहेत. चाळीतील छोट्याशा घरात एकत्र कुटुंबात मंजिरी आणि अमित आनंदी असले तरी त्यांना हव्या असलेल्या ‘स्पेस’ची उणिव दोघांनाही जाणवतेय. ज्यामुळे दोघांची एक विचित्र घुसमट सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अमित नवं घर घेण्याचं स्वप्नं बघतो आणि मंजिरीसहित घरातील सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि इथून सुरू होतो प्रवास त्याच्या मेहनतीचा. हे स्वप्न पूर्ण करतांना त्याला कोणते अडथळे येतात? त्यांच्या मदतीला कोण धावून येतं ? या संघर्षात त्याचा विजय होतो का ? या सर्वाची गोष्ट म्हणजे‘डबल सीट’ हा चित्रपट.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, 'डबलसीट' चित्रपटाच्या प्रिमीयरचे फोटो