आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नागरिक'ला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाच्या राज्य पुरस्कारासह पाच नामांकने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसामान्य नागरिकच खरंतर समाजाचा आणि राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकतात. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे आणि राजकारणाचे वास्तव सामान्य नागरिकांपुढे उलगडत असते. नेमक्या याच माध्यमाच्या अंगाने सामान्य माणसाला काय वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केलेल्या आरती सचिन चव्हाण यांच्या साची एन्टरटेन्मेट निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित नागरिक या चित्रपटाला राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार स्पर्धेचा सर्वोत्तम छायाचित्रणासाठी असलेला पुरस्कार तर जाहीर झाला आहेच पण त्याचबरोबर अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनाबरोबारच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम संवाद आणि सवोत्तम गीत लेखन अशी पाच नामांकनेही जाहीर झाली आहेत.