आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस इंडिया\' अमृता पत्की अडकली लग्नाच्या बेडीत, बघा Wedding Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
2006 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी करणारी आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पत्की 7 जानेवारी रोजी विवाहबद्ध झाली. जो कानेकर हे तिच्या नव-याचे नाव आहे. पुण्यात अमृता आणि जोचा विवाहसोहळा पार पडला.  महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. 

‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने त्याचवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मिस अर्थ’ स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने 2010 मध्ये 'हाईड अँड सीक' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण येथे फारसे यश न मिळाल्याने ती मराठी सिनेमांमध्ये वळवली. 'सत्य सावित्री सत्यवान' या सिनेमाद्वारे 2012 मध्ये मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. अलीकडेच तिची मुख्य भूमिका असलेला 'कौल मनाचा' हा सिनेमा रिलीज झाला.  

अमृता ही अभिनेत्रीसोबतच एक प्रसिद्ध मॉडेल आहे. मुंबईच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अमृताचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमृताला ग्लॅमर जगताची पार्श्वभूमी नव्हती. पण तरीही तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सध्या देशातील एक अग्रणी मॉडेल म्हणून ओळखली जाते.देश-विदेशातील नामवंत फॅशन डिझायनर्ससाठी तिने रॅम्प वॉक केले आहे. त्याबरोबरच आपली संगीताची आवड जपत आंतरराष्ट्रीय संगीत मैफलींचे निवेदनही ती करते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, अमृताच्या लग्नाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...