आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी आपल्या मालिकेचा सिक्वेल येणार, काहीहां हं श्री, आवर आता... वाचा, खळखळून हसवणारे संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका येत्या 23 जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. जान्हवीच्या बाळाच्या बारशाने मालिकेचा शेवट होणारेय. मालिका संपणार हे कळल्यावर मालिकेच्या अनेक चाहत्यांनी मग आता मालिकेत काय होणार? इथपासून श्री-जान्हवी आता कधी भेटणार इथपर्यंत अनेक गोष्टी विचारायला सुरूवात केली. काही वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी मालिकेचा सिक्वेल होणार असल्याच्याही वावड्या पसरवल्या. मात्र असा कोणताही सिक्वेलचा सध्या विचार होत नसल्याचा दावा मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसमधल्या सुत्रांनी केलाय. त्यामुळे आता ही मालिका कायमची प्रेक्षकांचा निरोप घेणार हे निश्चित झाले आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. साडे सातशे भागांचा टप्पासुद्धा मालिकेने पार केला. मात्र मध्यंतरीच्या काळात मालिकेला उतरती कळा लागली होती. जान्हवीचा स्मृतीभ्रंश, नऊ महिन्यांपासून अधिक काळ लांबलेली तिची डिलिव्हरी, पिंट्याचे लग्न, खलनायिका असलेल्या जान्हवीची आई शशिकलाचा तऱ्हेवाईक स्वभाव, तिने सुनेला छळणे यामुळे सोशल मीडियावरुन तिची खिल्ली उडवली जात होती.
इतकेच नाही तर जान्हवीचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर सुपरहिटच झाला. त्यावरुन आलेले विनोद, उखाणे यांनी मालिके इतकीच प्रेक्षकांची करमणूक केली. सोशल मीडियावर तर काहीही हं श्रीचे जोक्स वा-यासारखे पसरले.
खरं तर एखादी मालिका, सिनेमा किंवा एखादे पात्र लोकप्रिय झाले, की त्याच्या नावाने किंवा संवादाने जोक्स तयार करणे हे तर ओघाओघाने आले. अगदी आलोकनाथ, आलिया भट, रजनीकांत ते अगदी बराक ओबामांपर्यंत साऱ्यांनाच अशा गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. त्यातून तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर या दोन कलाकारांचीही सुटका झाली नाही. रसिक प्रेक्षकांनी श्री आणि जान्हवीच्या या संवादांच्या विनोदांचा आस्वाद घेतला.
आता मालिका निरोप घेत असताना, आम्ही सोशल मीडियावर गाजलेल्या श्री आणि जान्हवीच्या या 'काहीही हं श्री' या संवादांचा नजराणा खास प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत.
चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा खळखळून हसवणारे खास संवाद...
बातम्या आणखी आहेत...