आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरस्वती आणि घाडगे कुटुंबामध्ये होणार बाप्पाचे आगमन, असा असेल सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातच उत्साहाचे वातावरण आहे. सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या सरस्वती, घाडगे & सून आणि कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमांमध्ये देखील गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशाच्या आगमनाने सगळी संकंट दूर होऊन जाउ दे, सगळ्यांच आयुष्य टेंशन फ्री होऊ दे हेचं मागण यंदा गणरायापुढे असणार आहे. 
 
असे होणार सेलिब्रेशन  
- सरस्वती मालिकेत भैरवकरांच्या वाड्यावर गणेशाचे आगमन होणार असून यावेळी उत्सव खास असणार आहे. 'एक गाव एक गणपती' असे आयोजन करण्यात येणार आहे. 
- नुकत्याच सुरु झालेल्या घाडगे & सून या मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशाच्या मूर्तीची स्थापना पारंपरिक पद्धतीने होईल. गणपती आगमनाच्या शुभमुहूर्तावर माईना आणि घाडगे परिवाराला आवडलेली अमृता पहील्यांदाच घाडगेच्या घरी येणार आहे आणि दुसरीकडे अक्षयचे जिच्यावर प्रेम आहे ती कियारा देखील येणार आहे या दोघी माईसमोर आल्यावर त्यावर माईची काय प्रतिक्रिया असेल हे बघणे रंजक असणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, गणपती विशेष भागातील PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...