आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganpati Celebration In Honar Sun Mi Hya Gharachi

\'पुढच्या वर्षी लवकर या\'च्या जयघोषात श्री-जान्हवीने सहकुटुंब गणपती बाप्पांना दिला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या ‘होणार सून मी ह्या घरची’या मालिकेतल्या गोखले कुटूंबाने गणपती बाप्पांना निरोप दिला. गोखले कुटूंब हे नेहमी प्रत्येक सणवार हे परंपरागत पध्दतीने साजरे करतात. अगदी पारंपरिक पद्धतीने श्री आणि जान्हवी सहकुटुंब बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. गोखलेंच्या घरी अकरा दिवस पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावाला निघाले. विसर्जनाला श्रीच्या सहाही आई आणि काका, आत्यासोबत जान्हवीची आईदेखील उपस्थित होती.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या मालिकेतून सामिजक संदेश देण्यात आला. इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व, सणसाजरे करण्याला गोंगाटाचे स्वरूप येऊ देऊ नका असा संदेश मालिकेमधून देण्यात आला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बाप्पाला निरोप देतानाची गोखले कुटुंबीयांची छायाचित्रे...