आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: \'गारवा\' मध्ये सुनील बर्वेसोबत झळकली होती ही अभिनेत्री, हुंडा घेतल्याचा लागला होता आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी म्युझिक अल्बममध्ये प्रसिद्ध गाण्यांत 'गारवा'चे नाव येणार नाही असे होऊच शकत नाही. मिलिंद इंगळेच्या गारवा या गाण्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यास सुनील बर्वे आणि स्मिता बन्सल या जोडीने सोबत काम केले होते. आज स्मिता हिंदी मालिकांतील प्रसिद्ध चेहरा आहे.   बालिका वधू मालिकेसाठी मिळाला आहे पुरस्कार...
 
 बालिका वधू मालिकेसाठी मिळाला पुरस्कार..
 स्मिताला बालिका वधू या कलर्स मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेत तिने सुमित्रा भैरो सिंगची भूमिका केली होती. स्मिताने झी टीव्हीवरील अमानत, आशिर्वाद आणि सरहदे या मालिकांतही काम केले आहे. 2008 साली आलेल्या कर्ज चित्रपटातही तिने भूमिका केली होती. 
 
 हुंडा घेतल्याचा होता आरोप..
 स्मितावर तिची वहिणी मेघा गुप्ताने हुंडा घेतल्याचा आरोप केला होता. स्मिताच्या भावाचे नाव सौरभ आहे. सौरभ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. स्मिताची वहिणी  मेघाने दिलेल्या तक्रारीत स्मिताच्या वडिलांनी तिच्याकडून 50 लाख रुपये घेतल्याचा तसेच स्मिताने तिच्या परवानगीविना तिची ज्वेलरी पळवल्याचा आरोप केला होता. पण कालांतराने या आरोपातून स्मिताची मुक्तता करण्यात आली. 
 
 2000 साली झाले लग्न..
 स्मिताच्या पतीचे नाव अंकुश मोहला आहे. स्मिता 8 डिसेंबर 2000 साली विवाहबंधनात अडकली. आज स्मिता दोन मुली स्ताशा आणि अनघा यांची आई आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्मिता बन्सलचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...