Home »Bollywood »Marathi Cinekatta» Gashmir Mahajani Pay Tribute To Victims Of Amarnath Terror Attack

दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना गश्मीर देणार नृत्याद्वारे श्रध्दांजली!

दिव्य मराठी वेब टीम | Jul 13, 2017, 18:07 PM IST

  • दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना गश्मीर देणार नृत्याद्वारे श्रध्दांजली!
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर आणि पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 यात्रेकरू ठार झाले. अभिनेता गश्मीर महाजनी येत्या 21 जुलैला त्यांना आपल्या डान्स अकॅडमीद्वारे श्रध्दांजली अर्पित करणार आहे.

अभिनेता गश्मीर महाजनीची गेल्या 17 वर्षांपासून पुण्यामध्ये स्वत:ची डान्स अकॅडमी आहे. दरवर्षी या अकॅडमीचे वार्षिक संमेलन होते. ज्यात अकॅडमीचे विद्यार्थी परफॉर्म करतात. यंदा 21 जुलैला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वार्षिक संमेलन होणार आहे. या संमेलनात आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाद्वारे गश्मीर दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रध्दांजली अर्पण करणार आहे.

गश्मीर याविषयी म्हणतो, “अमरनाथ हल्याविषयी ऐकल्यावर आणि वाचल्यावर माझ्या काळजात चर्र झालं. तेव्हापासून मी अस्वस्थ होतो. मी एक कलाकार आहे आणि मी माझ्या कलाकृतीतूनच आपल्या भावना व्यक्त करू शकतो. म्हणूनच मी माझ्या अकॅडमीच्या वार्षिक संमेलनाला एका डान्स अॅक्टव्दारे या दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या यात्रेकरूंना श्रध्दांजली देणार आहे आणि माझ्या भावनांना वाट करून देणार आहे.”

गश्मीर महाजनी हा एकुलता एक मराठी सेलिब्रिटी आहे, ज्याची स्वत:ची डान्स अकॅडमी आहे. तो त्याच्या डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वत: कोरीओग्राफी करतो. त्याच्या अकॅडमीच्या या वार्षिक संमेलनात भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारापासून ते कंटेम्पररी डान्स फॉर्मपर्यंत वेगवगळ्या प्रकारचे नृत्यप्रकार पाहायला मिळणार आहेत.

Next Article

Recommended