आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'काय रे रास्कला\'साठी अशी झाली गौरवची निवड, रिअल लाईफमध्ये श्रुती मराठे आहे पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमानंतर अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्राचा ‘काय रे रास्कला’ हा दुसरा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 14 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. ‘व्हेंटिलेटर’च्या भरघोस यशामुळे प्रियांकाची निर्मिती असलेला दुसरा मराठी सिनेमा नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सिनेमातून अभिनेता गौरव घाटणेकर मेन लीडमध्ये झळकणार आहे. राजा ही व्यक्तिरेखा गौरवने सिनेमात साकारली आहे. 

कोण आहे गौरव घाटणेकर...
गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला. या मालिकेत गौरवसोबत कादंबरी कदम मेन लीडमध्ये होती. गौरवने सुभाष घईंच्या विसलिंग वूड्स इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवले आहे. गौरवला पहिला ब्रेक 'रुस्तम की दास्ताँ' या सिनेमातून मिळाला होता. नसीरुद्दीन शाह यांना रोल मॉडेल मानणा-या गौरवने मराठीत ‘रेडीओ नाईट्स’, 'तुझी माझी लव्ह स्टोरी' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.  

'तुझी माझी लव्ह स्टोरी'च्या सेटवर जुळले श्रुती मराठेसोबत सूत...
गौरव घाटणेकरचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठेसोबत झाले होते. 4 डिसेंबर 2016 रोजी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. श्रुती आणि गौरवच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेते नाना पाटेकरांसोबत बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना यांनीही लग्नाला हजेरी लावून श्रुती-गौरवला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यासोबतच अभिजीत खांडकेकर, अमृता खानिवलकर, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, नेहा पेंडसे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटींनी श्रुती-गौरवच्या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती.

कशी झाली गौरवची सिनेमासाठी निवड... 
एका मुलाखतीत गौरवने सांगितले, ''गिरिधरन सर मला आठ महिन्यांपूर्वी भेटले तेव्हा ते मला म्हणाले होते, की हा सिनेमा करताना मी तुलाच कास्ट करणार. एवढ्या मोठ्या सिनेमाबद्दल मी विचार केला नसल्याने मी थोडेसे दुर्लक्षच केले. पण मी बालीला फिरायला गेलो होतो तेव्हा मला गिरिधरन सरांचा फोन आला तू आहेस तसा ये.  मी जेव्हा गिरिधरन सरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला या सिनेमाच्या लीडसाठी विचारलं आणि त्यानंतर मला समजलं, की हा सिनेमा प्रियांका चोप्रा यांच्या प्रॉडक्शनचा आहे. मी लगेच सिनेमासाठी होकार दिला.''
 
'काय रे रास्कला'त भाग्यश्रीसोबत जमली गौरवची जोडी...  
'काय रे रास्कला' या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री मोटेसोबत गौरव रोमान्स करताना दिसणार आहे. कोल्हापूर आणि सोलापूर येथे या सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. सिनेमातील चेहरा तुझा कोहिनूर हे गाणे रिलीजआधीच गाजत आहे. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधू चोप्रा यांनी केली असून डॉ. सत्यशील बिरादर आणि संगीता मांजरेकर सहनिर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. तर कुनिका सदानंद यांनी कार्यकारी निर्मातीची भूमिका बजावली आहे. या सिनेमात गौरवसोबत बालकलाकार निहार, अभिनेत्री भाग्यश्री मोटे, निखिल रत्नपारखी, सुप्रिया पठारे, अक्षर कोठारी, श्रीकांत मस्की, ऐश्वर्या सोनार ही कलाकारांची फौज असणारेय.   

पुढील स्लाईड्सवर बघा, गौरव आणि श्रुती यांच्या लग्नाचे खास फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...