आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या होम प्रॉडक्शनची जेनेलिया सांभाळणार कमान, कथानकांची करणार निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः क्यूट कपल रितेश आणि जेनेलिया देशमुख - Divya Marathi
फाइल फोटोः क्यूट कपल रितेश आणि जेनेलिया देशमुख
लग्नानंतर जेनेलियाची पुन्हा चित्रपटाकडे वळण्याची योजना नसली तरी रितेशच्या होम प्रॉडक्शनअंतर्गत बनणाऱ्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
एकेकाळी आघाडीच्या अभिनेत्री राहिलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन 'जज्बा'द्वारे काजोल 'दिलवाले'द्वारे चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहेत. श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, रविना टंडन, जुही चावला यासारख्या अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर ब्रेक घेऊन पुन्हा चित्रपटसृष्टीची वाट धरली. विद्या बालन तर इंडस्ट्रीत नेहमी सक्रिय असल्याचे दिसते.
2012 मध्ये रितेशसोबत विवाहबद्ध झालेल्या जेनेलियाने हिंदीपेक्षा दक्षिणेकडील चित्रपट करण्यास प्राधान्य दिले होते. 2012 मध्येच तिचा रितेशसोबतचा 'तेरे नाल लव हो गया' रिलीज झाला, ज्याची प्रेक्षकांनी भरभरून प्रशंसा केली. आता एका गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर जेनेलिया ब्रँड्स आणि जाहिरात क्षेत्राशी जोडली जात असली तरी चित्रपटामध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, रितेशच्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीची सूत्रे जेनेलियाच्या हाती राहणार असे दिसते.
रितेशने याबाबत म्हटले की, जेनेलियाने नेहमी आपल्या आवडीचे चित्रपट केले. सध्या ती माझ्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये लक्ष देत आहे. आम्ही दोघे सोबत एका चित्रपटामध्ये काम करणार असून तो मराठीत असेल की हिंदीमध्ये हे अद्याप ठरलेले नाही. सध्या मराठीमध्ये माझी होम प्रॉडक्शन सुरू झाले असून याद्वारे अनेक मराठी चित्रपटांच्या कथानकावर सध्या काम चालू आहे.
पुढे वाचा, याविषयी जेनेलिया काय म्हणते...