आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​IN PICS: 'घाडगे & सून' मालिकेतील सूनेने शेअर केला Selfie, निमित्त होते खास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' या मालिकेमधील अमृता घाडगे म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने मालिकेला तीन महिने पूर्ण झाल्याच्या आनंदात तिचा माई आणि अक्षय बरोबरचा सुंदर असा फोटो तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. या फोटोला साडेपाचशेहून अधिक लाईकस मिळाले आहेत. भाग्यश्रीला तिच्या पहिल्याच मालिकेमधून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून ती आता अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली आहे.

 

मालिकेत सुरु आहे हा ट्रॅक...

गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरु असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लच सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत. अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरु झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळ करण्यासाठी तयार झाली आहे.

 

या मैत्रीच्या नात्यामध्ये नकळत एक गंमतीदार गोष्ट घडते. अक्षयच्या रूममध्ये कियारा असताना अचानक माई रूममध्ये येतात या दरम्यान कियाराला लपविण्यासाठी अमृता आजारी असल्याचे नाटक करते. अमृताला होत असलेल्या कोरड्या उलट्यामुळे माईना ती गरोदर असल्याचा संशय येतो. आता या संशयामधून कसे अमृता – अक्षय बाहेर पडणार ? कियाराला कसे लपविणार ? सध्या मालिकेमध्ये सुरु असलेली अमृता, अक्षय आणि कियाराची लपवछपवी अजून किती दिवस घाडगे परिवारापासून लपून राहील हे बघणे गंमतीदार असणार आहे.

 

कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचा स्थळ तिच्या वडिलांनी आणलं असून अक्षय कसं कियाराला परत मिळवेल ? अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? या सगळ्या गुंत्यामधून नात्यांना एक वेगळीच रंगत येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी बघत रहा 'घाडगे & सून'.


पाहुयात, मालिकेच्या सेटवरचे निवडक बिहाइंड द सीन्स फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...