आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांची रंगत आता एक तासाच्या संगतीत, पाहा 'घाडगे & सून'चे स्पेशल एपिसोड्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'घाडगे & सून' मालिकेमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरु असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लच सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत. अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरु झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळ करण्यासाठी तयार झाली आहे. पण, अक्षयचा कियाराला स्वत:च्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी सुरु असलेला प्रयत्न जर माईना कळला तर ? अक्षयच्या या प्रयत्नामध्ये अमृताची देखील त्याला साथ आहे हे माईना कळल्यावर अमृता त्यांना कशी सामोरी जाईल ? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. या सगळ्या गुंत्यामध्ये अक्षय आणि अमृता कसे आपल्या मैत्रीच्या नात्याला जपतील हे बघणे रंजक असणार आहे. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम आता त्यांना एक तास बघायला मिळणार आहे १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत फक्त कलर्स मराठीवर.
 
 अमृताचे मामा मनोहर घाडगे सदन मध्ये आपले बस्थान बसवणार आहेत, मामाचा असं करण्यामागचा हेतू अमृताला आणि अक्षयला कळला नाही. मामांच्या येण्याने घाडगे सदनामध्ये बरीच धम्माल मस्ती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि त्यात भर म्हणजे मामांनंतर कियारा देखील घाडगे सदनामध्ये येणार त्यामुळे लपवाछपवीचा खेळ अजूनच रंगणार आहे. कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचा स्थळ तिच्या वडीलांनी आणलं असून अक्षय कसं कियाराला परत मिळवेल ? अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? या सगळ्या गुंत्यामधून नात्यांना एक वेगळीच रंगत येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी बघत रहा घाडगे & सून १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत फक्त कलर्स मराठीवर.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिकेतील मुख्य कलाकार..
बातम्या आणखी आहेत...