(गिरीजा आणि सुहृद यांच्या लग्नाची छायाचित्रे...)
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले आणि सुहृद गोडबोले आज
आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. 'तारे जमीन पर'मधून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी गिराजा ओक हिचं लग्न लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा सुपुत्र सुहृदबरोबर 10 नोव्हेंबर 2011 रोजी झाले होते. लग्नासाठी गिरीजाने खास चंदकळा नववार विणून घेतली होती. मेंदी, दागदागिने, हेअर स्टाईल आणि भरजरी नववारीत गिरीजाचे सौंदर्य अधिकच खुलले होते.
या दोघांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारमंडळी हजर होती. लग्नानंतर एक जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. रिसेप्शनला अभिनेता संतोष जुवेकरने गंमत म्हणून गिरीजा आणि सुहृदला बकेट आणि झाडणी लग्नाची भेट म्हणून दिली होती. हे बघून दोघांनाही हसू अनावर झाले होते.
आता गिरीजा आणि सुहृद आईबाबा झाले असून त्यांच्या संसारवेलीवर कबीर नावाचे गोंडस फूल फुलले आहे. गेल्यावर्षी 17 जूनला कबीरचा जन्म झाला.
आज गिरीजा आणि सुहृदच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या साखरपुडा आणि लग्न आणि वेडिंग रिसेप्शनची खास झलक या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा गिरीजा आणि सुहृदच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण...
फोटो साभार - फेसबुक