आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Diwali Special:\'...अन् फटाक्यांपासून कायमचा झालो दूर\', सांगताय गिरीश कुलकर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी इंडस्ट्रीतील एक ताकदीचा अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णी यांची ओळख आहे. कधी त्यांच्या  कॉमेडीने प्रेक्षकांना हसवले तर तर कधी त्यांच्यातील खलनायक पाहून भल्याभल्यांना घाम फुटला. आगामी चित्रपट 'फास्टर फेणे' मधील त्यांच्या निगेटीव्ह भूमिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. खास दिवाळीनिमित्त  गिरीश यांनी दिव्य मराठीशी खास बातचीत केली आणि त्यांच्या सेलिब्रेशनची खास माहिती दिली. यंदाची दिवाळी आहे व्यस्ततेची...
 
'फास्टर फेणे'चे प्रदर्शन तोंडावर आले आहे त्यामुळे साहजिकच गिरीश कामात बिझी आहेत. त्यांनी सांगितले की, "यंदाची दिवाळी शूटमध्येच जाणार आहे पण वेळ मिळेल तसा कुटुंबाबरोबर घालवण्याचा प्रयत्न करतो."
 
दिवाळीबद्दल सांगताना गिरीश म्हणाले की, "दिवाळी हा सण हर्षउल्हास घेऊन येतो. अशा या आनंदाच्या क्षणी दुसऱ्यांना त्रासदायक वाटतील असे फटाके उडवू नये. लहान असताना फटाके उडवतानाचा स्वतःसोबत झालेल्या एका अपघाताने मनात असे काही घर केले की तेव्हापासून फटाके उडवणे कायमचेच बंद केले. समाजाला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशाप्रकारे दिवाळी साजरी करावी"
 
 
बातम्या आणखी आहेत...