आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही ग्लॅमरस अॅक्ट्रेस आता देणारेेय विज्ञानाचे धडे, जाणून घ्या काय आहे ही भानगड!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाटावी यासाठी हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा अमृताचा हा प्रयत्न आपल्या आगामी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमासाठी आहे. ‘श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित व ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत हा सिनेमा २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ग्लॅमरस अमृता पत्की आपल्या या भूमिकेबद्दल सांगते की, चित्रपटातील माझ्या भूमिकेला खूप वेगळी शेड आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेत त्यांच्याशी उत्तम समन्वय साधणाऱ्या शिक्षिकेची ही भूमिका आहे. किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींच कुतूहल असतं. बऱ्याचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतूहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखाळतात. याच विषयावर ‘कौल मनाचा’ या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे.
‘राजेश पाटील’, ‘विठ्ठल रूपनवर’ व ‘नरशी वासानी’ निर्मित ‘कौल मनाचा’ या सिनेमात अमृतासहित राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अमृताचा ग्लॅमरस अंदाज आणि जाणून घ्या अमृताविषयी बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...