आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यात अशी ग्लॅमरस आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही जोडी घराघरांत जाऊन पोहोचली. या मालिकेत दोघांना चक्क सहा आई दाखवल्या आहेत. दोघांभोवती फिरणारे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याने ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या दरम्यान, तेजश्री आणि शशांक यांची मनं जुळली. दोघांनी लग्न केले. छान सुखाचा संसार सुरु होता. पण आज आलेल्या बातमीने दोघांच्या संबंधांमधील दूरावा स्पष्ट झाला आहे. पुण्याच्या कौटुंबीक न्यायालयात त्यांनी घटस्फोटाता अर्ज दाखल केला आहे.
चित्रपट आणि मालिकेचे प्रतिबिंब समाजात उमटत असते. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर या टीव्हीवरच्या जोडीचे खासगी आयुष्यातही मनं जुळली असल्याचे वृत्त आल्यावर सिनेरसिकांना भरभरुन आनंद झाला होता. त्यांच्या लग्नाचीही खुप चर्चा झाली होती. पण आता दोघे वेगवेगळे होणार असल्याने त्यांच्या नात्याची गडद छाया सिनेरसिकांच्या आयुष्यावर पडली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, ग्लॅमरस तेजश्री प्रधानचा लुक...