आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glamours Amruta Khanvilkar\'s Sexy Haircut Gives Her Sensuous Look

अमृता खानविलकरचा झाला Makeover, नव्या फिल्ममध्ये दिसणार ‘न्यू लूक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता खानविलकर ही मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री आहे, ह्यात काही वादच नाही. पण ही ग्लॅमरस अमृता आता अजून ग्लॅमरस दिसू लागलीय. ह्याचं कारण आहे, तिचा नवा हेअरकट. ती सध्या श्रेयस जाधव निर्मित आणि समीर जोशी दिग्दर्शित बस स्टॉप हा सिनेमा करतेय. ह्या सिनेमात हा तिचा ग्लॅमरस लूक तिचे चाहते पाहू शकणार आहेत.
आपल्या लूकविषयी divyamarathi.comला सांगताना अमृता म्हणते, “पण जर ह्या सिनेमासाठी मी हा खास लूक केलाय, असं तुम्हांला वाटतं असेल, तर तो गैरसमज आहे. एक्चुअली माझा हा लूक म्हणजे एक एक्सिडंट आहे. माझे काही केस माझ्या हेअरड्रेसरकडून चुकून जळाले होते. त्यामूळे ते अर्धवट जळलेले केस काही मी ठेवू शकत नव्हते. म्हणून मग माझे हाताच्या कोप-यापर्यंत मोठे केस एकदम खांद्यापर्यंत कमी करावे लागले. आणि मग जो काही हेअरकट झाला, त्यामूळे मला खूप क़म्पलिमेन्ट मिळाले. माझा मित्र फोटोग्राफर तेजस नेरूरकरने माझं लाल वनपिस घातलेलं फोटोशूट केलं. आणि मी त्या फोटोशूटमधून खूप ग्लॅमरस दिसू लागले. नेमकं त्याचं दरम्यान समीरने मला ही फिल्म ऑफर केली.”
“मी एकतर दोन वर्ष माझ्या लूकमध्ये काही वेगळेपण केले नव्हते. आणि एवढे लहान केस तर माझे गेले कित्येक वर्ष नव्हतेच. त्यामुळे असावं कदाचित, माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना तर हा कम्पलिट मेकओव्हरच वाटला. गंमत म्हणजे मला ह्या लूकमध्ये दिग्दर्शक समीर जोशीने पाहिलं होतं. पण निर्माता श्रेयस जाधवने मला ह्या नव्या लूकमध्ये पाहिलं नव्हतं. आणि सिनेमामध्ये माझी भुमिका एका महाविद्यालयीन मुलीची आहे. त्यामुळे जेव्हा समीरने मला सिनेमात घेतलं. तेव्हा माझ्या पूर्वीच्या लूकमूळे श्रेयसला मी त्या भूमिकेसाठी नको होते. त्या भूमिकेच्या अनुषंगाने मी खूपच मोठी दिसते, असं त्याचं म्हणणं होतं. पण नंतर जेव्हा तो मला भेटला. तेव्हा माझा लूक पाहून तो चकितच झाला. मी त्याला अगदी शाळकरी मुलगी वाटत होते.”
बसस्टॉपचे कथानक अमृता सांगते,“पाच कॉलेजवयीन मुलांचे त्यांच्या आईवडिलांशी असलेल्या नात्याविषयीची ही कथा आहे. मी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, सिध्दार्थ चांदेकर ह्यांच्याभोवती ही कथा फिरते. श्रेयसच्या ‘ऑनलाइन बिनलाइन’ ह्या धमाल सिनेमासारखीच ही सूध्दा लाइट-हार्टेड फिल्म असणार आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमृता खानविलकरचा ग्लॅमरस न्यू लूक