आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या रंगात रंगूनी गेल्या मराठी सिनेसृष्टीच्या या 12 ललना, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झी टॉकीजने 2015च्या कॅलेंडरवर झळकलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर)
दरवर्षी झी टॉकीजच्या कॅलेंडरच्या थीमविषयी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असते. एका खास वैशिष्ट्यासह झी टॉकीज लवकरच यावर्षीचे कॅलेंडर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. अद्याप हे कॅलेंडर लाँच झालेले नाही. मात्र झी टॉकीजच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर यंदाच्या कॅलेंडरची थीम उघड करण्यात आली आहे.
झी टॉकीजच्या यंदाच्या कॅलेंडरवर महाराष्ट्राचे सौंदर्य अवतरणार आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेली आणि विविधरंगी सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्र भूमीला अनेकविध कलांच्या आविष्काराचे कोंदण लाभले आहे. याच वैविध्यपूर्ण कलांचा संगम मराठी चित्रपटांमधून वेळोवेळी दिसला. अभूतपूर्ण सौंदर्याने नटलेला हा महाराष्ट्र आणि अजोड सौंदर्याने नटलेली ही मराठी चित्रनगरी... या दोघांची गुंफण घालत झी टॉकीज सौंदर्याचा अनोखा नजराणा सिनेरसिकांसाठी घेऊन येत आहे.
2015च्या कॅलेंडरवर अभिनेत्री संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, अंजली पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, पूर्वा पवार, तेजस्विनी पंडीत, आदिती पोहणकर, नेहा पेंडसे, अमृता खानविलकर, मानसी नाईक या अभिनेत्रींच्या निखळ सौंदर्याची झलक बघायला मिळतेय. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अभिनेत्रींचे हे ग्लॅमरस रुप आपल्या कॅमे-यात टिपले आहे प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी.

झी टॉकीजने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलेली 2015च्या कॅलेंडरची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा निसर्गाच्या रंगात रंगून गेलेल्या मराठी सिनेसृष्टीच्या ललनांचा खास अंदाज...