Home »Bollywood »Marathi Cinekatta» Gudi Premachi 4th Story Of Prem He Series

ललित आणि भाग्यश्री उभारणार 'गुढी प्रेमाची', ही आहे 'प्रेम हे'च्या सीरिजची चौथी गोष्ट

दिव्य मराठी वेब टीम | Mar 25, 2017, 17:19 PM IST

अनेकदा आपण आयुष्यात अशा काही लोकांना भेटतो ज्यांच्याशी आधी कधीही संबंध आलेला नसतो. पहिले ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही, पण हळू हळू कधी ती व्यक्ती आपलीशी होते हे कळतंच नाही आणि जेव्हा वेगळं व्हायची वेळ येते तेव्हा मात्र मनाला एक वेगळीच हुरहूर लागून जाते आणि एकमेकांच्या नकळत प्रेमाची गुढी उभी राहते. 'प्रेम हे'ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे "गुढी प्रेमाची".
ही गोष्ट आहे पेइंग गेस्ट असलेल्या दोन व्यक्तींची... अमृता आणि स्वप्नीलची... इच्छा नसतानाही एकेमकांबरोबर एक रूम शेअर करत असताना कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यानांच कळत नाही. गुढी पाडवा निम्मित झी युवाची ही खास भेट येत्या सोमवारी 27 मार्च आणि मंगळवार 28 मार्चला रात्री 9 वाजता प्रेक्षकांना मिळणारेय. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या अदाकारीने एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर प्रसारित होणारेय.

पुढे वाचा, काय आहे या भागाची स्टोरी...

Next Article

Recommended