आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gudipadwa Celebration On Mazhe Pati Saubhagyavati Set

\'माझे पती सौभाग्यवती\'च्या सेटवर साजरा झाला गुढीपाडवा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुढीपाडवा हा मराठमोळा सण आज महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. हा सण सामान्यांपासून मराठी सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मोठ्या उत्साहाने साजरा करतात. असेच काहीसे चित्र झी मराठीवर प्रसारित होणा-या 'माझे पती सौभाग्यवती' मालिकेच्या सेटवर दिसले. गुढीपाडवा निमित्त हा स्पेशल एपिसोड सूट करण्यात आला. हा एपिसोड आज रात्री (8 एप्रिल) प्रसारित होणार आहे.
मालिकेच्या सेटवर म्हणजेच 'लक्ष्मी'च्या घरी उत्साहात गुढीपाडवा साजरा झाला. अंगणात रांगोळी आणि घरावर गुडी उभारून मालिकेतील कलाकारांनी सण साजरा केला. यावेळी लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता धुरी आणि वैभवच्या पात्रात दिसणारा वैभव मांगले गुढी उभारताना दिसले. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'माझे पती सौभाग्यवती'च्या सेटवर झालेले गुढीपाडवा सेलिब्रेशनची काही छायाचित्रे...