आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Guru\' Ankush Chaudhari And \'Mango Dolly\' Urmila Kothare In Dil Dosti Duniyadari

‘दिल दोस्ती दुनियादारी’त पोहोचला गुरू, हिसकावलं माजघरातल्या दोस्तांचं घरं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये ‘गुरू’ अंकुश चौधरी आणि ‘मँगो डॉली’ उर्मिला कोठारे पोहोचलेले आपल्याला दिसणार आहेत. गुरू माजघरातल्या दोस्तांचं घरचं बळकावताना पाहायला मिळणार आहे. दिल दोस्ती दुनियादारीतल्या मित्रांचं बिंधास्त आयुष्य आपण आत्तापर्यंत पाहिलं. पण आता गुरूच्या दादागिरी पूढे घाबरलेले, गोंधळलेले आणि बावरलेले मित्र आपल्याला दिसणार आहेत.
ह्याविषयी मिनल सांगते, “ गुरू आणि मँगो डॉली आमच्या घरी अचानक आलेत. एवढंच नाही तर, ते आमचं घरचं त्यांनी आता बळकावतायत. त्यामुळे आम्ही घाबरलेलो आहोत. आम्ही घाबरलो असलो तरीही गुरूसोबत आलेली मँगो डॉली मात्र एकदम माझ्यासारखी होती. त्यामुळे मला ती आवडली. ”
आशु म्हणतो, “हो ना, आणि ह्या घरात आलेला प्रत्येक माणूस पहिल्यांदा मलाच टार्गेट करतो. त्यामुळे ह्या गुरूने तर माझा हातही पिरगळलाय.”
रेश्माही घाबरलेली होती. ती म्हणते, “ह्या गुरूने आम्हांला त्रास दिला. मँगो डॉलीने मला कामाला लावलं. आम्हांला त्यांच्या तालावर नाचायला लावलं. त्यामुळे मी खूप घाबरलीय.”
कैवल्य तर एरवी कोणाचं ऐकत नाही. पण त्याला गुरूने 'बकरा' बनवला. कैवल्य सांगतो, “गुरूने सगळ्यांना त्याच्या गाण्यावर नाचवलंय. आणि मला तर चक्क गायला लावलंय.”
एना मात्र खुश होती. ती म्हणते, “सगळ्यांना त्रास देणारा गुरू खुप हँडसम होता. त्यामुळे बाकींच्यांना त्याचा राग आला होता. पण मी तर त्याच्यावर फुल फिदा होते. त्याने आम्हांला नाचायला लावलं. त्याची त्रास देण्याची स्टाइल मला आवडली. पण सगळ्यात आधी मी नाचले. म्हणून माझे सगळे मित्र मैत्रिण माझ्यावर चिडले.”
समजुतदार सुजयने मात्र गुरूवर आवाज चढवलाच. तो म्हणतो, “अगोदर आम्ही सगळे गप्प होतो.पण शेवटी आमच्याच घरातनं आम्हांलाच बाहेर काढणा-या ह्या गुरूवर माझा आवाज चढलाच.”
'बडे जिगरवाला' गुरू ह्या दोस्तांना का त्रास देतोय. हे शेवटी अंकुश चौधरीलाच विचारलं त्यावर अंकुश म्हणतो, “गुरू वाईट नाहीये. उलट तो नेहमीच चांगल्या लोकांशी चांगलंच वागतो. आणि त्यालाही माहित आहे. ही माजघरातली मंडळी खूप चांगली आहेत. आणि म्हणूनच त्यांना तो धडा शिकवायला आलाय. अन्यायापूढे वाचा फोडणं गरजेचं असतं हे दाखवायला आलाय. 'सा-यांची असेल साथ तर कशाला उद्याची बात' ही गुरू सिनेमाची टॅग लाइन का आहे, ते गुरू आणि मँगो डॉली ह्या दोस्तांना आणि प्रेक्षकांना समजावून सांगतलीच.“
पुढील स्लाइडमध्ये वाचा, गुरू आणि मँगो डॉली ने का दिला ह्या मित्रांना त्रास