आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scenes : व्हिडिओमध्ये पाहा कसे तयार झाले \'तू हि रे\'मधील \'गुलाबाची कली...\' गाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तू हि रे' या सिनेमातील "गुलाबाची कली बघा हलदीनं माखली" या गाण्याच्या मेकिंगचा खास व्हिडिओ)
'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' असे हिट सिनेमे मराठी इंडस्ट्रीला देणारे फिल्ममेकर संजय जाधव लवकरच 'तू हि रे' हा आणखी एक रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'तू हि रे'मधून संजय जाधव आता प्रेमाचा त्रिकोण घेऊन येत आहेत. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित आणि स्वप्नील जोशी या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत. या सिनेमातील ब-याच भागांचे शूटिंग मुंबईत पार पडले आहे.
काही दिवसांपूर्वीत या सिनेमातील लग्नाचा एक सिक्वेन्स शुट करण्यात आला. ज्यासाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. या लग्नात ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली’ हे गाणं तेजस्विनी पंडीत आणि स्वप्नील जोशी यांच्यावर शूट करण्यात आले. हे कलरफुल गाणं अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर या तिघांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात या तिन्ही गायक-गायिकांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. याच गाण्याच्या मेकिंगचा खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
चला तर मग वरील व्हिडिओवर क्लिक करुन पाहा, कसे तयार झाले ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली’ हे गाणे आणि सोबतच पुढील स्लाईड्समध्ये पाहा, याच गाण्याची ऑन लोकेशनची छायाचित्रे...