आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हाफ तिकीट’ सिनेमाचा धमाकेदार टीझर आणि साँग लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय प्रभावीपणे व चांगल्या रीतीने पडद्यावर मांडले जात आहेत. असाच एक हटके विषय घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांनी प्रेक्षकांसाठी ‘हाफ तिकीट’ चित्रपटाची सुरेख भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे. व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असलेल्या ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचं टिझर आणि ‘चल चल’ ‘चल चल’ असे बोल असणारं गीत नुकतंच एका शानदार कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी चित्रपटातील संपूर्ण टीमसह चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दिग्दर्शक समित कक्कड यांनी आशय व सादरीकरणात अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. आता ‘हाफ तिकीट’ च्या माध्यमातून दोन लहान मुलांच्या स्वप्नांचा अनोखा प्रवास ते घेऊन येणार आहेत. जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पहाता येणार आहे. 15 जुलैला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.
आपल्याकडे नसलेली, पण हवीहवीशी वाटणारी एखादी गोष्ट मिळवण्याचा सुंदर प्रवास व त्यासाठी लागणार.. ‘हाफ तिकीट’! हा लहानपणीच्या आठवणी ताज्या करणारा एक नॉंस्टेलजिक अनुभव आहे, असं दिग्दर्शक समित कक्कड यांनी यावेळी सांगितल. शुभम मोरे व विनायक पोतदार या दोन्ही बालकलाकारांनी शूटिंगच्या दरम्यान घडलेले किस्से सांगत हा सिनेमा आपण खूपच एन्जॉय केल्याचं सांगितल. वेगळी भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेता भाऊ कदम यांनी यावेळी बोलून दाखवला. ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट आपल्यासाठी एक समृद्ध अनुभव असल्याचं सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी आवर्जून सांगितलं.
शुभम मोरे व विनायक पोतदार या दोन बालकलाकारांसह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एम माणिकदान यांची असून लेखन ज्ञानेश झोटिंग याचं आहे. गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी.वी प्रकाश यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचं असून संकलन फैझल इम्रान यांचं आहे. साऊंड डिझाइन अनमोल भावे यांनी केलं असून कलादिग्दर्शन वासू पाटील यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिलिंद शिंगटे, तन्मयी देव आहेत. लाईन प्रोड्यूसरची जबाबदारी आनंद गायकवाड, राहुल तुळसकर यांनी सांभाळली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या कार्यक्रमात कोण-कोण उपस्थित होते...
बातम्या आणखी आहेत...