आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: कॉलेजमध्ये असताना असा धमाल मस्ती करायचा टीव्हीचा \'राणा पैलवान\', मालिकेसाठी वाढवले वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज आपल्या सर्वांचा लाडका 'राणादा' अर्थात हार्दिक जोशी 28 वर्षाचा झाला आहे. आपल्या खास अंदाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा हार्दिक मुळ पुण्याचा आहे. हार्दिकचा जन्म 6 ऑक्टोबर 1989 साली पुण्यात झाला पण त्याचे सर्व शिक्षण मुंबईत झाले. हार्दिकला सर्वजण आज 'राणा पैलवान' म्हणून ओळखतात पण कॉलेजध्ये असताना हार्दिक कुठल्याही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच दिसायचा. तेव्हा हार्दिकला पाहून तो इतक्या बलदंड शरीराचा मालक होईल असे कुणासही वाटले नसेल. 
 
हार्दिक सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे अनेक फोटो तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. या अनेक फोटोंपैकी हार्दिकचे शाळा-कॉलेजात असतानाचे फोटो खास तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. 
 
राणादाची भूमिका वाटते कठिण..
हार्दिकचे शिक्षण मुंबईसारख्या शहरात झाले त्यामुळे ग्रामीण भागाचा जरा कमीच अंदाज त्याला होता. राणादाच्या भूमिकेतून हार्दिकला रांगडा, मुलींना लाजणारा आणि सभ्य असा पैलवान साकारायचा होता. पण सर्वात जास्त कठिण होते ती पैलवानासारखी बॉडी कमवायची. याबाबत हार्दिकला विचारले असता त्याने पैलवानांइतकी नव्हे पण बरीच मेहनत घेतल्याचे सांगितले.  
 
घरातही राणा म्हणूनच मारतात हाक..
हार्दिकच्या प्रसिद्धीपासून त्याच्या घरचेही चुकले नाहीत. त्यांच्यावरही हार्दिकच्या लोकप्रियतेचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच की काय आता त्याला घरातही 'राणा' म्हणूनच संबोधले जाते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, हार्दिकचे कॉलेज शाळेदरम्यानचे धमालमस्ती करतानाचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...