आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तुझ्यात जीव रंगला बंद होणार का? रांगड्या राणादाने दिला चाहत्यांसाठी असा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मराठी प्रेक्षकांची लाडकी मालिका तुझ्यात जीव रंगला गेल्या काही दिवसांपासून विवादात अडकली होती. आता ही मालिका बंद होणार की काय अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली होती. पण आता खुद्द राणादा म्हणजेच हार्दिक जोशीने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये चाहत्यांसाठी कास संदेश दिला आहे.  
 
राणादाने या व्हिडिओमध्ये राणादा संपला नाही आणि कधी संपणार नाही असा संदेश या व्हिडिओत दिला आहे. यावरुन प्रेक्षकांचा जीव तुझ्यात जीव रंगला या मालिकेत रंगतच राहील असे म्हणावयास हरकत नाही. 
 
काय होते प्रकरण..
तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे ज्या गावात शूटिंग चालु आहे त्या वसगडे येथे लोकसंख्येपैकी 80 टक्के लोक जैन समुदायाचे आहे. त्यामुळे या गावात चिकन, मटण खाणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. मात्र तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हापासून मालिकेतील कलाकार, तंत्रज्ज्ञ आणि अन्य लोकांना चिकन, मटणाचे जेवण पुरवले जात असल्याने गावातील जैन नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी एकत्र येऊन सरपंचांकडे तक्रार केली.
अखेर गावच्या लोकांनी मालिकेचे चित्रीकरणच थांबवले होते. दुसरी बाजू अशीही सांगितली जात होती की, तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे दररोज गावात होणाऱ्या दर्शकांच्या गर्दीमुळे आणि त्यांच्या वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगला वैतागून वसगडे गावच्या ग्रामस्थांनी हे मालिकेचे चित्रीकरण थांबवले होते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा मालिकेचे ऑन लोकेशन फोटोज् आणि शेवटच्या स्लाईडवर राणादाचा खास व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...