आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ढोलकीच्या तालावर’मध्ये पोहोचलेल्या आक्कासाहेबांना मिठी मारून रडली रूपाली, का? वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्टार प्रवाह’च्या पुढचं पाऊल मालिकेतल्या उपद्व्यापी रूपालीची आक्कासाहेबांच्या घरातून गच्छंती झाली. आणि आता रूपाली पोहोचलीय, ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ ह्या रिएलिटी शोमध्ये. ढोलकीच्या तालावरमध्ये जरी अभिनेत्री शर्मिला शिंदे रूपाली बनून आलेली नसली. केवळ एक स्पर्धक म्हणूनच आली असली, तरीही पहिल्या भागाच्या चित्रीकरणापासूनच तिला सगळेजण आक्कासाहेबांच्या स्टाइलमध्ये ‘कळलं’ म्हणून चिडवत होते.
पहिल्या भागाचं चित्रीकरण संपलं आणि चित्रीकरण स्टुडियोमधून बाहेर पडणा-या शर्मिलाला एक छान सरप्राइज मिळालं. समोर हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ उभे होते. हर्षदाला पाहताच शर्मिलाने ‘मम्मा’ म्हणत तिला मिठी मारली. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.
पुढचं पाऊल मालिकेत विळ्या-भोपळ्याचं नातं असलेलं, पाहिलेल्या ह्या सासू-सूनेला ख-या आयुष्यात आई-मुलीच्या नात्याच्या बंधानत पाहून छान वाटलं. Divyamarathi.comशी बोलताना शर्मिला ह्याविषयी म्हणाली, “ती खरंच माझी दूसरी आई आहे. माझी जन्मदात्री पुण्यात आहे. आणि ही मुंबईत. मला दोन आई आहेत. मी मुंबईत एकटी राहते. दिवसभर शुटिंगमध्ये असते. तर ती जेव्हा केव्हा दुकानात जाऊन तिच्या घरासाठी भाजी-घरातलं सामान खरेदी करते. तेव्हा माझ्या स्वयंपाकघरात काय आहे, काय नाही हे पाहून माझ्यासाठी सुध्दा घेऊन येते. मी तिच्या साडीला, ड्रेसला, दागिन्यांना ते अगदी घरातल्या कपबशीला सुध्दा कॉम्पलिमेन्ट जरी दिली तरी मला ते आवडलंय, हे कळल्यावर माझ्या घरी ती गोष्ट पोहोचलेली असते. अगदी आई मुलीचं जेवढ्या आत्मियतेने, काळजीने करते. तेवढंच ती माझ्यासाठी करते.”
आई मुलीला जशी शाळेच्या गँदरिंगला जाताना टिप्स देते, अगदी तशाच टिप्स हर्षदा खानविलकर शर्मिलाला देत होती. ‘केस व्यवस्थित बांधत जा’, ‘टेन्शन घेऊन परफॉर्मन्स द्यायचा नाही.’ ‘ आपले दागिने टोचत असतील तर डिझाइनरला अगोदरच सांगायचं नाहीतर परफॉर्मन्स बिघडतो.’
हर्षदाच्या ह्या टिप्स देऊन झाल्यावर ती दिव्य मराठीशी बोलू लागली, “मी फक्त पाहायला आले होते की, शर्मिला आज वेळेत सेटवर पोहोचलीय ना. तिचं कामात लक्ष आहे ना. स्पर्धेसाठी तिची मानसिक तयारी आहे ना. शर्मिला बाकी मुलीसारखी डान्सर नाही. ती चांगली अभिनेत्री आहे. पण तिच्यासाठी हे वेगळं क्षेत्र आहे. त्यामुळे तिच्या काळजीपोटी मी सेटवर पोहोचले. मी जशी मालिकेत थोडीशी स्ट्रिक्ट सासू आहे. तशीच ख-या आयुष्यात थोडीशी स्ट्रिक्ट आईसुध्दा आहे. शर्मिलाचं उगीच कौतुक करत नाही. पण तिच्यात हा शो जिंकण्याची क्षमता आहे, आणि म्हणूनच तिच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला आले होते.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का सोडली शर्मिलाने पुढचं पाऊल मालिका
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...