दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत ज्यासाठी माजघरातली मंडळी गेले एक आठवडा अकोल्याला आली होती, त्या रेवाचं लग्न आता झालंय. रेश्मा आणि राकेशच्या नात्याचं सत्यही आता सगळ्यांना कळून चुकलंय. त्यामुळे आता माजघरातले मित्र परत मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्या ह्या ट्रेनप्रवासातचं शेवटचा एपिसोड संपणार आहे. गेले आठवडाभर माजघरातल्या मित्रांना असलेलं टेन्शन जरी संपलं असलं, तरी आता रेश्मा तिच्या घरीच राहिल्याने तिच्या विरहाचं दु:ख पाचजणांच्या मनात दाटलेलं दिसणार आहे.
सुजय ह्याविषयी सांगतो, “मैत्री हे चिरंतन नातं असतं. आयुष्यातल्या चढ उतारांमध्ये हे मित्र कसे एकमेकांसोबत नेहमी असतात. हे दिल दोस्ती दुनियादारीच्या ह्या एका वर्षात पाहिला मिळालं. पहिलं पर्व संपताना आता ह्या माजघरातल्या मित्रांच्या मैत्रीचे बंध अजूनच दृढ होताना तुम्हांला दिसतील. सपेंसही आहे, पण शेवट अर्थातच गोड होणार आहे.”
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची सुरूवात ट्रेनच्या प्रवासानेच झाली होती. पहिल्या भागात रेश्मा अकोल्याहून मुंबईला जात असताना सुजय, कैवल्य आणि आशु तिला ट्रेनमध्ये भेटले होते. आता मालिकेचा शेवटही पून्हा अकोला ते मुंबई प्रवासानेच होणार आहे.
ह्यावर कैवल्य म्हणतो, “ थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं होणार आहे. जिथून कथानकाची सुरूवात झाली. तिथेच कथानक संपतंय. फरक फक्त एवढाच आहे, की एका वर्षापूर्वी एकमेकांना अनोळखी असलेले आम्ही सर्व होतो. आता आमच्या कोणाच्याही आयुष्यात एक जण जरी नसला तरीही आम्हांला करमत नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमची मैत्री आहे, पण त्याही पेक्षा आम्हांला एकमेकांची सवय लागलीय.”
एना सांगते, “आम्ही एकत्र आलो, की नेहमी धमाल करतो. पण शेवटच्या भागात मात्र थोडं टेन्शन तुम्हांला जाणवेल. कारण आता आमच्यासोबत रेश्मा नसणार आहे. गाडीत आम्ही फक्त पाचच जण बसणार आहोत. त्यामूळे आम्ही थोडे दु:खी आहोत. रेश्मा नाही म्हणून आमची खूप रडारड होते. मी ट्रेनच्या बाहेर थांबलेली असते. रेश्माला अकोल्याला सोडून तिच्याशिवाय मुंबईला जायला तयार नसते. पण मग हे सगळे मला ओढून नेतात. असं सगळं नाट्यमय कथानक तुम्हांला दिसेल.”
पुढील स्लाइमध्ये वाचा, शेवटच्या भागात काय होणार हे सांगतायत, मीनल, रेश्मा आणि आशु
(फोटो- स्वप्निल चव्हाण)