आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Holi Spl: Photos - \'सरस्वती\' मालिकेतले होळी सेलिब्रेशन आणि वंदीचा तमाशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरस्वती मालिकेत दहनाची होळी आणि रंगांची होळी साजरी झालीय. दहनाच्या होळीत विशेष ड्रामा झाला नाही. पण रंगांच्या होळीत सरस्वतीची बहिण वंदीने भांग पिऊन भरपूर तमाशा केलाय.
ह्याविषयी सर्जेराव म्हणजेच अभिनेता संग्राम साळवी म्हणतो, “भैरवकरांच्या वाड्यात ह्या अगोदर कधीही कोणीही भांग आणलेली नाही. पण सर्जेराव मात्र वाड्यात होळीच्यावेळी लपवून भांग घेऊन आलाय. आणि त्याने ती भांग थंडाईमध्ये मिसळवून सरस्वतीची बहिण वंदी आणि कान्हाला पाजलीय. कान्हा त्यामुळे जाऊन झोपलाय. पण वंदीने मात्र भरपूर ड्रामा क्रिएट केलाय. राघव भैरवकरला तिने भांग पिऊन त्याची निवड चुकली. सरस्वती ऐवजी राघवने वंदीशी लग्न करायला हवं होतं, मग वाड्याची शोभाही वाढली असती, असं म्हटलंय. त्यामुळे अर्थातच सर्जेरावला जे मनोरंजन हवं होतं, ते होळीच्यावेळी मिळालंय. त्याला वाटलं होतं, त्यापेक्षा जरा जास्तच मनोरंजन त्याचं झालंय.”
कान्हाची भूमिका करणारा अभिनेता माधव देवचक्के म्हणतो, “कान्हाला रंगांमध्ये खेळायला खूप आवडतं. तो दादाला आणि सरूला रंग लावतो. मामाला होळी खेळायला अजिबात आवडत नाही. पण मामाला रंग लावून तो खूप छळतो. राघवला रंग लावायची खरं तर कोणाचीच हिम्मत नाही. पण कान्हाला राघव कधीच नाही म्हणू शकत नाही. पण सर्जेरावने भांग मिसळवल्यावर मात्र कान्हाला चक्कर येते. तो झोपतो. पण वंदी मात्र भरपूर तमाशा करते. ”
सरस्वती मालिकेच्या सर्वच एक्टर्सनी रंगांची होळी खेळलेली दिसत होती. मालिकेसाठी रंगांची होळी खेळता खेळता होळी खेळण्याची खरी धमालही त्यांनी अनुभवलेली दिसत होती.
माधव ह्याविषयी सांगतो, “खरं तर मला होळीच्या रंगांनी खूप त्रास होतो. त्यामुळे मी कधी होळी खेळत नाही. पण आमच्या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने आमच्यासाठी हर्बल कलर्स आणले होते. ते टॅल्कम पावडरसारखे आहेत. कसे-बसे दोन-तीन मिनीटं अंगावर राहून पटकन हवेनेच उडून जातायत. त्यामुळे पहिल्यांदा होळी खेळण्याची मजा मी मनमुराद लुटली.”
एकिकडे मालिकेचे होळी स्पेशल एपिसोडचे चित्रीकरण सुरू होते. तर दुसरीकडे कलाकारांचा क्रिकेटचा खेळ रंगला होता. क्रिकेटमधून थोडा वेळ काढून राघव भैरवकर म्हणजेच अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, “आम्ही क्रिकेट खेळण्याची संधी शोधतच असतो. एक तर १२ तास सेटवरच चित्रीकरण करत असल्याने व्यायाम काहीच करता येत नाही. त्यामुळे फावल्या वेळात क्रिकेट खेळल्याने फिटही राहता येतं. आणि मानसिक थकवाही दूर व्हायला मदत होते. शिवाय कलाकारांच्या क्रिकेट मॅचेसही अधूनमधून होतात, त्यासाठीही थोडी प्रॅक्टिस होते.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, वंदीची कशी उडाली तारांबळ आणि सरस्वती-राघवची रोमँटिक होळी
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...