आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Pics: Himanshoo Malhotra And Amruta Khanvilkar Tie The Knot On 24th Jan

वाजलं रे वाजलं... अमृता झाली हिमांशू मल्होत्राच्या घरची सून, पाहा Wedding Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अमृता खानविलकरची लग्नाची छायाचित्रे)

मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर 24 जानेवारी रोजी लग्नबेडीत अडकली. दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत अमृता बोहल्यावर चढली. दिल्लीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात अमृता आणि हिमांशूचे नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नापूर्वी म्हणजे 23 जानेवारीला या दोघांची संगीत आणि कॉकटेल पार्टी रंगली.
दिल्ली का मुंडा, मुंबईकी लडकी
अमृता आणि हिमांशू गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमृता आणि हिमांशूच्या लग्नाची खास छायाचित्रे...