आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Nach Baliye 7 Participant – Himmanshoo Malhotra Celebrates His First Birthday With Wife

अमृताने साजरा केला पतीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, पाहा बर्थडे बॅशचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती हिमांशूसोबत अमृता खानविलकर)

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच आपल्या पतीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत अमृता याचवर्षी जानेवारीमध्ये लग्नगाठीत अडकली. लग्नानंतरचा हिमांशूचा हा पहिलाच वाढदिवस आहे. दिल्लीत अमृताने हिमांशूचा वाढदिवस साजरा केला.
Divyamarathi.com ला दिलेल्या एका खास मुलाखतीत हिमांशूने सांगितले, "वाढदिवस साजरा करण्यासाठी मी आणि माझी पत्नी अमृता आमच्या दिल्लीतील घरी आलो आहोत. येथील क्राउन प्लाझामध्ये आम्ही वाढदिवस साजरा केला. अमृताने यासाठी जय्यत तयारी केली. माझ्यासाठी खास पाइनअॅपल केक तिने मागवला. दोघांनी एकत्र डिनर घेतले. हा वाढदिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता. संपूर्ण दिवस आम्ही दोघांनी एकत्र घालवला."

अमृता आणि हिमांशू लवकरच 'नच बलिए'च्या सातव्या पर्वात आपल्या नृत्याची झलक दाखवणार आहेत. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अमृता आणि हिमांशू पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हिमांशूच्या बर्थडे बॅशची खास छायाचित्रे...