आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी म्हणाले, \'नानांसारखा नट होणे नाही\', वाचा \'नटसम्राट\'मधील दमदार डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाजलेल्या 'नटसम्राट' या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनविण्याची सध्या तयारी सुरू आहे. त्यात नाना पाटेकर यांनी मराठीत साकारलेली भूमिका हिंदीत साकारण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले होते. मात्र नाना एवढी ताकदीची भूमिका कोणताच कलाकार करू शकत नाही. मी ही नाही. त्यामुळेच मी ही भूमिका करण्यास नकार दिला आहे, असे बिग बींनी प्रांजळपणे कबुल केले आहे. त्यामुळे आता हिंदीत कोणता कलाकार ही भूमिका साकारणार याची उत्सुकता आहे.
'नटसम्राट' हा सिनेमा यावर्षी 1 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता. या सिनेमाने 40 कोटींहून अधिकचा गल्ला तिकिटबारीवर जमवला होता. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'वर आधारित हा सिनेमा होता. नाटकाप्रमाणेच सिनेमातील संवादही खूप गाजले. नाना पाटेकरांनी म्हटलेले दमदार संवाद प्रेक्षकांच्या मनावर रुजले.
आज या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, 'नटसम्राट' सिनेमातील गाजलेल्या संवादांचा खजिना... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'नटसम्राट' या गाजलेल्या सिनेमातील गाजलेले संवाद...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...