आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Holi Spl: छोटा पडदा रंगणार होळीच्या रंगात, वाचा मालिकांमध्ये होळीत कोणते येणार Twist

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्हीच्या छोट्या पडद्यावरची होळी यंदा केवळ औपचारिकता म्हणून होळी पेटवणे आणि रंगपंचमी खेळणे इतपत सीमित राहणार नसून ही होळी संस्मरणीय करण्याचे स्टार प्रवाहने ठरवले आहे. मालिकांमधली कथानक पुढे घेऊन जाणारा होळीचा सण हे यंदाचे ठळक वैशिष्ट्य. त्यामुळे नकुशी, पुढचं पाऊल, दुहेरी, गोठ आणि आम्ही दोघे राजा राणी मालिकांमध्ये दणक्यात होळी साजरी होणार आहे.
 
नीलकांती पाटेकरांनी साकारलेली बयोआजी ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरलेली ‘गोठ’ ही मालिका कोकणातल्या पार्श्वभूमीवरची. कोकणात होळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.त्यामुळे कोकणामध्ये ज्या पद्धतीने होळी साजरी केली जाते त्याचपद्धतीने ती गोठमध्ये दाखवली जाईल. शिमग्याच्या वेळी पालखी नाचवत प्रत्येकाच्या घरी नेणे ही कोकणामध्ये एक मोठी प्रथा मानली जाते. ही पालखी त्या ग्रामदेवतेची असते जी गावतल्या प्रत्येकाच्या घरी नाचवत नेली जाते.

गोठ मध्ये देखील अशीच ग्रामदेवतेची पालखी सालाबादप्रमाणे म्हापसेकरांच्या घरामध्ये येते. होळी ही कोकणामध्ये ५ ते १५ दिवस साजरी केली जाते त्यामध्ये संकासूरचा प्रत्येक घरोघरी जाऊन नाच हा एक आकर्षणाचा बिंदू मानला जातो. संकासूर म्हणजे एक विनोदी पात्र असते जे कोकणामध्ये घराघरात जाऊन एक आनंददायी वातावरण तयार करते.त्यामुळे 'गोठ' मध्ये देखील संकासूर येतो आणि म्हापसेकरांच्या वाड्यात एक नवीन चैतन्य निर्माण करून राधा विलास यांच्याबरोबर एक गमतीशीर खेळ खेळतो. मुख्य होळीच्या आसपास काही ठिकाणी होणारी अग्नीफेऱ्याची प्रथा ही यंदा गोठ मध्ये पाहायला मिळेल. या अग्नीफे-याच्या निमित्ताने बयोआजी राधा विरुद्ध काही षडयंत्र तर रचणार नाहीत ना याची धाकधूक प्रेक्षकांना आहे.
 
पुढे वाचा, नकुशी, पुढचं पाऊल, दुहेरी आणि आम्ही दोघे राजा राणी या मालिकांमध्ये येणा-या ट्विस्टविषयी... 
बातम्या आणखी आहेत...