आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत आदेश बांदेकरांच्या \'होम मिनिस्टर\', 26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारा होम मिनिस्टर. या कार्यक्रमाला आज यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर घराघरांत लोकप्रिय झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकरांनी 12 लाखांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. शहर, खेड्यात जाऊन आदेश बांदेकरांनी महाराष्ट्रातील वहिनींना पैठणीची भेट दिली. 
 
महाराष्ट्रातील वहिनींना होम मिनिस्टरचा मान मिळवून देणारे आदेश भावोजींच्या ख-या आयुष्यातील होम मिनिस्टर आहेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. आदेश यांच्या पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. 26 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे.

आदेश भावोजींना खरी ओळख मिळवून देणा-या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांना त्यांच्या आयुष्याची होम मिनिस्टर अर्थातच सुचित्रा बांदेकर कशा मिळाल्या.... 
 
इंट्रेस्टिंग आहे आदेश-सुचित्रा यांची लव्ह स्टोरी, चक्क  पळून जाऊन केले होते लग्न....
आदेश आणि सुचित्रा बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कपल. महाराष्ट्रातील तमाम वहिनींच्या लाडक्या भावोजींची लग्नगाठ कशी बांधली गेली, याचीही एक रंजक गोष्ट आहे. आदेश आणि सुचित्रा यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले होते. सुचित्रा यांच्या घरी प्रेमप्रकरण पसंत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी आदेश यांचे इंडस्ट्रीत स्ट्रगल सुरु होते. त्यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितले नाही. या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांनी लग्न केले आणि नंतर घरी कळवले. त्यांच्या लग्नाला निव्वळ 50 रुपये खर्च आला होता.

पुढे वाचा, सुचित्रा यांच्या घरात शिरुन आदेश यांनी केले होते त्यांना प्रपोज सोबतच बघा या दाम्पत्याची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...