आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honar Sun Mi Hya Gharachi Completes 700 Episodes

Celebration Time : ‘होणार सून मी ह्या घरची’चे झाले ७०० भाग पूर्ण सेटवर झालं सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने ७०० एपिसोड्स पूर्ण केल्याबद्दल मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन झालंय. मालिकेचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीने त्याच्या मुलीसोबत केक कापला. त्यानंतर सर्व कलाकारांनी एकत्र मिळून छान मेजवानी खाल्ली. श्रीखंड पूरी आणि गणशेत्सवाच्या दिवसात हे सेलिब्रेशन झाल्यामुळे जेवताना मोदकही होते.
मालिकेत आईआजीच्या भूमिकेत दिणा-या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणतात, “मालिका सुरू झाली, तेव्हा मी एका करारी आजीच्या भूमिकेत दिसले. पण आजीची सकारात्मकता वेगवेगळ्या प्रसंगांमधून दिसून आलीय. कधी लोकं भेटतात. तेव्हा मालिकेतल्या एखाद्या प्रसंगाबद्दल आवर्जून बोलतात. आम्हांला काय आवडलं, आवडलं नाही, ह्याची पोचपावती देतात.कालच एका बाईंचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला, की परवाच्या भागातलं आईआजीचं म्हणणं आम्हाला पटलं आणि आता आम्हीही आमच्या विचारात असा बदल करत आहोत.”
अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणते, “सकारात्मक वातावरण असेल तर, कलाकारांनाही जास्त काम करावंस वाटतं. जे आमच्या मालिकेबाबत होतं. म्हणूनच आज आम्ही सातशे एपिसोड्सपर्यंत मजल मारू शकतोय. आज तर आनंदाचा दिवस होता. त्यामूळे आम्ही डाएटिंग विसरून साग्रसंगीत जेवणावर मस्त फडशा पाडला.”
शशांक केतकर सांगतो, “ मला खरं तर ह्या मालिकेचे ७०० भाग होतील ,असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ते झाले, ह्याचं कारण त्यावेळी टेलिव्हीजनवर चालू असलेल्या मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी होती. लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळीमूळे अर्थातच आम्ही ७०० भागांपर्यंत पोहोचलो. माझी ही पहिलीच मालिका. खरं तर, मी सगळ्या कलावंतापेक्षा ज्युनिअर आहे, माझ्यासाठी हा पूर्णपणे वेगळा एक्सपिरीअन्स होता.”
जान्हवी प्रेगनन्ट असल्याने सध्या अनेकजण तेजश्रीला बरीच काळजी घ्यायला सांगतायत, त्याबद्दल तेजश्री म्हणते “नुकताच आम्ही जल्लोष गणरायाचा हा विशेष कार्यक्रम सादर केला. त्यात आम्ही मंगळागौरीचे खेळ खेळलो. त्यानंतर मला सोशल नेटवर्किंग साइट्सवरून जान्हवी आता डान्स नाही हं करायचा, असे सल्ले मिळू लागलेत. मी सध्या ‘कार्टी काळजात घुसली’ नाटक करतेय. नाटकाच्यावेळी लोकं भेटायला येतात. तेव्हा ते माझ्या पोटाकडे पाहतात. आणि सांगतात की, ह्या नाटकात, तू एवढ्या उड्या नको मारू. पण ही त्यांची निरागसता आणि माझ्याविषयीची आपूलकी असल्याने मी त्यांच्यावर हसत नाही.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, जान्हवीच्या प्रेगनन्सीबद्दल काय म्हणाला शशांक