आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होणार सून..\'च्या जान्हवीला कन्यारत्न, 23 जानेवारीला प्रसारित होणार शेवटचा भाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालिकेतील सहा सासू, आई आणि बाळासोबत जान्हवी. मालिकेच्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणातील हे छायाचित्र आहे. शेवटच्या भागात बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. - Divya Marathi
मालिकेतील सहा सासू, आई आणि बाळासोबत जान्हवी. मालिकेच्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणातील हे छायाचित्र आहे. शेवटच्या भागात बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनवर तब्बल अडीच वर्षे गाजलेली 'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. जान्हवीच्या बाळाच्या बारशाने मालिका संपणार आहे. नऊ महिन्यांहून अधिक काळ लांबलेली जान्हवीची डिलिव्हरी झाली असून तिला मुलगी झाली आहे. जान्हवी आणि श्रीने आपल्या लेकीचे नाव 'कृष्णा' असे ठेवले आहे. 23 जानेवारी रोजी प्रक्षेपित होणाऱ्या शेवटच्या भागात हे पाहता येईल. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले.
15 जुलै 2013 ला प्रक्षेपित झालेल्या पहिल्या भागापासून ‘होणार..’ ने प्रेक्षकांच्या मनावर
अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. नायक, नायिका आणि तिच्या सहा सासवा अशी आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेल्या झी मराठी वाहिनीला ‘होणार’ने टीआरपीचे आकडे वर ठेवण्यास साथ दिली. 25 जानेवारीपासून नव्याने दाखल होणारी ‘पसंत आहे मुलगी’ ही मालिका ‘होणार सून…’ ची जागा घेणार आहे.
चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारे कथानक, सर्वच कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिकेने आपलेसे केले. मालिकेने नुकताच 750 भागांचा टप्पाही पार केला होता.
मालिकेत काही महिन्यांपूर्वीच जान्हवीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. चला तर मग मालिकेच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहुयात गोखल्यांच्या घरी कसे झाले होते जान्हवीचे डोहाळ जेवण...