आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: ह्या ग्लॅमरस हिरॉइनच्या पायात रूतला काटा, तरीही महिनाभर कसं केलं शुटिंग?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहा महाजन
सिल्व्हर स्क्रिनवर एखादी अभिनेत्री जेव्हा दिसते, तेव्हा ती छानसा मेकअप, व्यवस्थित केलेली हेअरस्टाइल, महागडे डिझायनर कपडे घालूनच दिसते. तिने सुंदर दिसावं म्हणून तिच्या दिमतीला चार लोकं असतात. तिला उन लागू नये, म्हणून एक माणूस तिच्यासोबत छत्री घेऊन असतो. तर तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारा दुसरा माणूस असतो. दिग्दर्शक-निर्माते सुध्दा तिचे नखरे सांभाळत असतात. असं सर्वसाधारण चित्र गेल्या काही वर्षात आपल्यासमोर फिल्मच्या हिरोइनबाबत उभं राहिलंय.
मात्र अभिनेत्री नेहा महाजनला ‘निळकंठ मास्तर’ ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ह्यातलं काहीही मिळालं नाही. हिरोइनसाठी असलेली व्हॅनिटी तर नव्हतीच. पण भरजरी डिझाइनर कपड्यांएवजी संपूर्ण चित्रपट एक पांढरी साडी नेसून ती फिरलीय. ही साडीसूध्दा हजार रूपयाच्या आतलीच होती. मेकअप तर सोडाच. पण केसही न विंचरता कॅमेरासमोर उभं राहावं लागतं होतं. तिच्या स्किनची, तिच्या शरीराची काळजी घेतली जात नव्हती. तर तिला अनवाणी काट्या-कुट्यातून फिरावं लागलंय.
हे असं का, असा प्रश्न विचारल्यावर नेहा म्हणते, “ निळकंठ मास्तर ही एक देशभक्तीपर कथा आहे. स्वांतत्र्यपूर्व काळातल्या देशभक्त यशोदाच्या भूमिकेत मी आहे. यशोदा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. त्यामुळे अर्थातच खादीची साडी नेसणे हे ओघाने आलेच. पण त्यासोबतच माझी भूमिका खूप वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मी पहिल्यांदाच एवढ्या डी-ग्लॅम भूमिकेत आहे. पहिल्यांदाच अख्या सिनेमात एकच पांढच्या साडीत मी वावरलीय.”
” माझ्या भूमिकेसाठी अभिनेत्री नूतन ह्यांना मी डोळ्यासमोर ठेवलं होतं. सुजाता, बंदिनी, सारख्या चित्रपटांमधल्या पांढ-या साडीतल्या सोज्वळ,एक लांब वेणी घातलेल्या नुतनजींचं मी अनुकरण केलं होतं. वेशभुषा सोडली तर बाकी सारं स्वातंत्र्यापूर्व काळातलंच आहे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, नेहा महाजनच्या पायात कसा घुसला बाभळीचा काटा?