आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तारखेला रिलीज होणार हृतिक रोशनचा पहिला मराठी सिनेमा, स्वतः लाँच करणार आहे ट्रेलर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हृदयांतर’ या मराठी सिनेमातून बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. आपल्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाचा ट्रेलर हृतिक स्वतः लाँच करणार आहे. ‘हृदयांतर’ या सिनेमाद्वारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत आपलं निर्माता-दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे. त्याने या सिनेमाच्या रिलीजची तारीख ही ट्विटरद्वारे जाहिर केली आहे. यावर्षी 7 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय. आणि या सिनेमाचा पहिला ट्रेलर 28 मे रोजी लाँच होणार असून या कार्यक्रमाला हृतिक रोशन हजेरी लावणार आहे.
 
'हृदयांतर' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याविषयी विक्रम फडणीसने हृतिकला सांगताच, त्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. हृतिक आणि विक्रम यांची मैत्री खूप जुनी आहे. याविषयी विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन या सिनेमाचा भाग असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हृतिकने नेहमीच या ना त्या प्रकारे हृदयांतरला सपोर्ट केलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी एक स्पेशल दिवस असणार आहे.”
 
टी-सीरिज प्रस्तुत, टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...